सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • NDA II परीक्षेचा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी UPSC चे सर्व्हर डाऊन, हेल्पलाईन डेस्कही बंद; विद्यार्थ्यांची तक्रार, मुदतवाढीची मागणी
  • धक्कादायक! तळेगाव MIDC मध्ये गॅस गळतीमुळं दोन जणांचा मृत्यू तर तीन जण गंभीर, कामगारांमध्ये भीतीचं वातावरण
  • काँकरोच जनता पार्टीचा दिल्लीनंतर पुण्यातही एल्गार करणार; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणार
  • महाराष्ट्रात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज; मुंबई, पुणे आणि नाशिक 25 जिल्ह्यांना यलो अलर्ट
 शहर

निरोगी माता आणि सुरक्षित कन्या, हाच सशक्त समाजाचा पाया!

डिजिटल पुणे    11-06-2026 11:00:10

पुणे : पुणे शहरात महिलांच्या आरोग्यासाठी ‘जन सेहत सेतु’ अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या मोफत महिला आरोग्य तपासणी शिबिराला उपस्थित राहून, शिबिरात महिलांशी संवाद साधताना त्यांच्या आरोग्याच्या प्रश्नांवर चर्चा केली.

सर्वाइकल कॅन्सर (गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग) हा असा आजार आहे जो वेळेत लसीकरण (HPV Vaccine) आणि तपासणी करून पूर्णपणे टाळता येऊ शकतो. पण माहितीअभावी अनेक माता-भगिनी याकडे दुर्लक्ष करतात. या शिबिराच्या माध्यमातून आज याच विषयावर विशेष जनजागृती करण्यात आली आणि मोफत स्क्रीनिंगही उपलब्ध करून देण्यात आले.

पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियानाचा भाग असलेल्या या उपक्रमात शेकडो महिलांनी मोफत तपासणीचा लाभ घेतला. महिलांच्या आरोग्यासाठी राबवले जाणारे हे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे. या आयोजनाबद्दल सर्व तज्ज्ञ डॉक्टर्स आणि आयोजक संस्थांचे मनःपूर्वक आभार!

यावेळी प्रा. नूतन अग्रवाल, डॉ. अमोल लुंकड, डॉ. इशिता लुंकड, डॉ. प्रशांत चौधरी, डॉ. विरेंद्र ओस्तवाल, डॉ. एन. पी. जैन, डॉ. एस. के. जैन , डॉ. निखिल यादव , डॉ. प्रमोद उमरजी तसेच श्री. अनिल रडाडिया यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

 

 


 Give Feedback



 जाहिराती