सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • NDA II परीक्षेचा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी UPSC चे सर्व्हर डाऊन, हेल्पलाईन डेस्कही बंद; विद्यार्थ्यांची तक्रार, मुदतवाढीची मागणी
  • धक्कादायक! तळेगाव MIDC मध्ये गॅस गळतीमुळं दोन जणांचा मृत्यू तर तीन जण गंभीर, कामगारांमध्ये भीतीचं वातावरण
  • काँकरोच जनता पार्टीचा दिल्लीनंतर पुण्यातही एल्गार करणार; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणार
  • महाराष्ट्रात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज; मुंबई, पुणे आणि नाशिक 25 जिल्ह्यांना यलो अलर्ट
 जिल्हा

मुंबईत 'तुतारी'चा गजर, उरणच्या भावनाताईंचा सन्मान! राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनी शरद पवारांनी फुंकली निवडणुकीची रणशिंग

विठ्ठल ममताबादे ( प्रतिनिधी )    11-06-2026 16:57:42

उरण :  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार पक्षाचा २७ वा वर्धापन दिन मंगळवारी १० जून रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे कार्यकर्त्यांच्या प्रचंड उत्साहात साजरा झाला. सकाळी १० वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार, कार्याध्यक्षा खासदार सुप्रियाताई सुळे आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत उरणच्या नगराध्यक्ष भावनाताई घाणेकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या हस्ते भावनाताई घाणेकर यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. शरद पवार यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत उरण शहराच्या विकासासाठी, महिला सक्षमीकरणासाठी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सतत कार्यरत असणाऱ्या भावनाताई घाणेकर यांच्या कामाची दखल पक्षश्रेष्ठींनी घेतली.
 
यावेळी मार्गदर्शन करताना शरद पवार यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ५० टक्के जागा महिलांना देण्याचा धोरणात्मक निर्णय जाहीर केला आणि भावनाताई घाणेकर यांचा सत्कार हा याच महिला धोरणाचा भाग असल्याचे मानले जात आहे. "भगिनींना संधी मिळाली तर त्या कर्तृत्व दाखवू शकतात, ऑपरेशन सिंदूरबाबत दोन महिलांनी माहिती देऊन हे सिद्ध केले," असे पवार म्हणाले. पक्षामध्ये फूट पडली असली तरी विचाराने राहिलेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचे पवारांनी कौतुक केले आणि "जे राहिले ते विचाराने राहिले, तुमच्यासारखे कार्यकर्ते एकसंघ राहून विचारांना पुढे नेतील तर सत्ता आपोआप येईल" असा विश्वास व्यक्त केला. भावनाताई घाणेकर यांच्या सत्काराने उरण शहरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून "शरद पवार साहेबांच्या हस्ते उरणच्या लेकीचा सन्मान झाला, हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे," अशा प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार  पक्षाचे चिन्ह 'तुतारी फुंकणारा माणूस' आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील हा वर्धापन दिन सोहळा आणि शरद पवार यांचे भाषण महत्त्वाचे मानले जात असून राज्यभरातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंबईत उपस्थित होते.


 Give Feedback



 जाहिराती