सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुण्यात शिकलेले धीरज सेठ नवे लष्करप्रमुख; संरक्षण मंत्रालयाकडून आदेश जारी, देशसेवेत मोठी जबाबदारी
  • भारतीय हवाई दलाच्या विमान अपघातात 5 जणांचा मृ्त्यू; एअरक्राफ्टचे दोन तुकडे, आसाममधील घटनेनं देश हळहळला, चौकशीचे आदेश
  • पुणे वेधशाळेचा इशारा : 'एल निनो'चा मान्सूनवर परिणाम; महाराष्ट्रात कमी पावसाची शक्यता, शेतकऱ्यांना सावधगिरीचा सल्ला
  • मोठी बातमी! 22 ते 24 जूनदरम्यान पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचे दर्शन बंद; मंदिर प्रशासनाची महत्त्वाची सूचना
  • दुष्काळाचं संकट गडद? 'एल निनो' सक्रिय; महाराष्ट्रासह देशात कमी पावसाचा इशारा, शेतकऱ्यांची चिंता वाढली
  • : यंदाच्या नव्या शैक्षणिक वर्षापासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी नाही; शालेय शिक्षण विभागाकडून पहिली ते आठवीसाठी वेळापत्रक जाहीर
 जिल्हा

मनमाडमध्ये हृदयद्रावक घटना; पतीच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने पत्नीचाही दोन तासांत मृत्यू, एकाच वेळी निघाली अंत्ययात्रा

डिजीटल पुणे    13-06-2026 12:56:50

नाशिक : मनमाड शहरातील शांतीनगर परिसरात घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर हळहळला आहे. उपचारादरम्यान पतीचे निधन झाल्याची बातमी समजल्यानंतर पत्नीला तीव्र धक्का बसला आणि अवघ्या दोन तासांतच त्यांचाही मृत्यू झाला. परिणामी, पती-पत्नी दोघांचीही अंत्ययात्रा एकाच दिवशी एकाच घरातून निघाल्याने सर्वत्र शोक व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी अर्जुन देवरे यांच्यावर हृदयविकाराच्या त्रासामुळे नाशिकमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या पत्नी सुनंदा देवरे (वय ६८) या रुग्णालयात त्यांच्यासोबत राहत होत्या. काही आवश्यक वस्तू आणण्यासाठी त्या मनमाड येथील घरी परतल्या होत्या.

दरम्यान, गुरुवारी उपचारादरम्यान अर्जुन देवरे यांचे निधन झाल्याची माहिती कुटुंबीयांना मिळाली. त्यानंतर त्यांचा मृतदेह मनमाड येथे आणण्याची तयारी सुरू असतानाच, पतीच्या निधनाची बातमी ऐकून सुनंदा देवरे यांची प्रकृती अचानक खालावली. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, हृदयविकाराचा झटका आल्याने उपचार सुरू असतानाच पतीच्या निधनानंतर अवघ्या दोन तासांत त्यांनीही अखेरचा श्वास घेतला.

या दुहेरी आघातामुळे देवरे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. पतीचा मृतदेह घरी पोहोचण्यापूर्वीच पत्नीचेही निधन झाल्याने दोघांची अंत्ययात्रा एकाच वेळी काढण्यात आली. या घटनेने मनमाड परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, देवरे दाम्पत्याच्या आयुष्यातील दुःखद घटनांची मालिकाही यानिमित्ताने समोर आली आहे. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा होता. मात्र, दोन वर्षांपूर्वी त्यांच्या विवाहित तरुण मुलाचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. सलग झालेल्या या दुःखद घटनांमुळे देवरे कुटुंबावर मोठे संकट ओढवले असल्याची भावना नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.


 Give Feedback



 जाहिराती