सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुण्यात शिकलेले धीरज सेठ नवे लष्करप्रमुख; संरक्षण मंत्रालयाकडून आदेश जारी, देशसेवेत मोठी जबाबदारी
  • भारतीय हवाई दलाच्या विमान अपघातात 5 जणांचा मृ्त्यू; एअरक्राफ्टचे दोन तुकडे, आसाममधील घटनेनं देश हळहळला, चौकशीचे आदेश
  • पुणे वेधशाळेचा इशारा : 'एल निनो'चा मान्सूनवर परिणाम; महाराष्ट्रात कमी पावसाची शक्यता, शेतकऱ्यांना सावधगिरीचा सल्ला
  • मोठी बातमी! 22 ते 24 जूनदरम्यान पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचे दर्शन बंद; मंदिर प्रशासनाची महत्त्वाची सूचना
  • दुष्काळाचं संकट गडद? 'एल निनो' सक्रिय; महाराष्ट्रासह देशात कमी पावसाचा इशारा, शेतकऱ्यांची चिंता वाढली
  • : यंदाच्या नव्या शैक्षणिक वर्षापासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी नाही; शालेय शिक्षण विभागाकडून पहिली ते आठवीसाठी वेळापत्रक जाहीर
 जिल्हा

मी रोहितला शेतकऱ्यांच्या ओटीत टाकलंय ; राजेंद्र पवार भावूक, सरकारवरही साधला निशाणा

डिजीटल पुणे    13-06-2026 13:03:56

पंढरपूर : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी पंढरपुरात सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार आंदोलनस्थळी उपस्थित राहिले. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी भावनिक प्रतिक्रिया देत सरकारवरही टीकेची झोड उठवली.

"रोहितने शेतकऱ्यांसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे. बाप म्हणून मला काय वाटतं, असा प्रश्न अनेकजण विचारतात. पण मी त्याला शेतकऱ्यांच्या ओटीत टाकलंय. त्यामुळे शेतकरी हाच त्याचा खरा बाप आहे," अशा शब्दांत राजेंद्र पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

ते पुढे म्हणाले, "रोहितचं हे आंदोलन स्वतःसाठी नाही, तर सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आहे. आता या लढ्यात शेतकऱ्यांनी घरात बसायचं की आंदोलनात सहभागी व्हायचं, हे महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांनी ठरवायला हवं."

राज्य सरकारवर टीका करताना राजेंद्र पवार म्हणाले, "शेतकरी किंवा नागरिकांनी आपला आवाज उठवला नाही, तर सरकारला कधीच जाग येणार नाही. सध्याचं सरकार त्यांच्या धुंदीत धुंद असून सामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे."

दरम्यान, रोहित पवार यांनीही आपल्या आंदोलनाबाबत ठाम भूमिका घेतली आहे. सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या शासन निर्णयातील काही जाचक अटी हटविण्याची मागणी त्यांनी केली आहे. 2019 मधील लाभार्थींना मर्यादित लाभ देण्याची अट आणि भविष्यातील पीककर्ज परतफेडीची सक्ती यामुळे लाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहतील, असा दावा त्यांनी केला.

"या अन्यायकारक अटी मागे घेतल्याशिवाय अन्नत्याग आंदोलनातून माघार घेणार नाही," असा निर्धार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे राज्य सरकार या आंदोलनावर काय भूमिका घेते, याकडे आता राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.


 Give Feedback



 जाहिराती