सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ओमराजेंच्या तोंडाला शेण फासणार, धाराशिवमधील शिवसैनिक आक्रमक, 'ऑपरेशन टायगर' यशस्वी
  • बाळासाहेबांनी ज्यांच्यावर मुलासारखं प्रेम केलं, उद्धवजींनी भावासारखं प्रेम दिलं, त्यांच्यासोबत गद्दारी; संजय राऊतांच्या हल्लाबोल
  • मोठी बातमी : ठाकरेंच्या 6 फुटीर खासदारांचा गट स्थापन, आता शिंदेंच्या शिवसेनेत विलीन होणार!
  • ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा तापली; ओमराजे निंबाळकर दिल्लीत गेल्याच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
  • केंद्र सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्र पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी 733.28 रुपयांचा निधी मंजूर, मुख्यमंत्र्यांनी मानले आभार
 जिल्हा

दोन जिल्हे, सहा गड आणि सोलो ट्रेकचा पराक्रम; दुर्गेश डांगळे यांनी पूर्ण केला दुर्मिळ रेंज ट्रेक

डिजीटल पुणे    17-06-2026 14:27:55

माणगाव (रायगड) : रायगड जिल्ह्यातील चन्नाट, माणगाव येथील रहिवासी तथा सध्या मुंबई येथे वास्तव्यास असलेले दुर्गेश विठ्ठल डांगळे यांनी 18 ते 19 एप्रिल 2026 दरम्यान महाराष्ट्रातील अत्यंत दुर्मिळ आणि कमी परिचित असलेला "उतवड–भास्करगड–हरिहरगड–ब्रह्मगिरी–दुर्ग भंडार–अंजनेरी" हा रेंज ट्रेक एकट्याने (सोलो) पूर्ण करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

या ट्रेकमध्ये पालघर आणि नाशिक या दोन जिल्ह्यांतील सहा ऐतिहासिक गड-किल्ल्यांचा समावेश आहे. ट्रेकची सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी 17 एप्रिल रोजी पालघर जिल्ह्यातील सिर्सोनपाडा येथे मुक्काम केला. 18 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजता उतवड गडाच्या पायथ्याजवळून त्यांनी ट्रेकला सुरुवात केली.

उतवड गडाकडे जाणारी पायवाट शोधताना सुरुवातीला काही अडचणी आल्या. स्थानिक एका आजीबाईंनी दाखवलेल्या डोंगरधारेच्या मार्गाने त्यांनी चढाई सुरू केली. अवघ्या दीड तासात उतवड गड गाठत त्यांनी भास्करगडाच्या पोटातील महादेव मंदिराचे दर्शन घेतले. त्यानंतर भास्करगडाचा संपूर्ण परिसर पाहून ते पुढे हरिहरगडाच्या दिशेने रवाना झाले.

निरगुडपाडा मार्गे फणी डोंगराला वळसा घालत सायंकाळी हरिहरगडावर पोहोचल्यानंतर त्यांनी तेथील मनमोहक सूर्यास्ताचा अनुभव घेतला. विशेष म्हणजे त्या रात्री त्यांनी हरिहरगडावर एकट्यानेच मुक्काम केला.

दुसऱ्या दिवशी सूर्योदय पाहून त्यांनी ब्रह्मगिरी पर्वताकडे प्रस्थान केले. गंगाद्वार येथे दर्शन घेतल्यानंतर ब्रह्मगिरीवरील थरारक पायऱ्यांमधून मार्गक्रमण करत ते माथ्यावर पोहोचले. पुढे जठा मंदिर परिसरातून दुर्ग भंडार गाठून तेथील निसर्गसौंदर्याचा आनंद घेतला.

यानंतर त्यांनी अंजनेरी गडाकडे कूच केली. अवघ्या एका तासात अंजनेरी गडावर पोहोचून श्री हनुमानाचे दर्शन घेत ट्रेकची यशस्वी सांगता केली.

विशेष म्हणजे, हा ट्रेक त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आला होता. या मोहिमेदरम्यान त्यांनी आपल्या आयुष्यातील 100 वा सोलो गडभ्रमणाचा टप्पा पूर्ण केला. तसेच आतापर्यंत 47 वेळा किल्ल्यांवर सोलो नाईट कॅम्पिंग करण्याची उल्लेखनीय कामगिरीही त्यांच्या नावावर जमा झाली आहे.

ट्रेक पूर्ण झाल्यानंतर त्यांनी त्र्यंबकेश्वर बसस्थानकातून नाशिक रोड मार्गे मुंबईकडे प्रस्थान केले. दुर्गेश डांगळे यांच्या या धाडसी आणि प्रेरणादायी मोहिमेचे गिर्यारोहक आणि दुर्गप्रेमींकडून कौतुक होत आहे.


 Give Feedback



 जाहिराती