सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ओमराजेंच्या तोंडाला शेण फासणार, धाराशिवमधील शिवसैनिक आक्रमक, 'ऑपरेशन टायगर' यशस्वी
  • बाळासाहेबांनी ज्यांच्यावर मुलासारखं प्रेम केलं, उद्धवजींनी भावासारखं प्रेम दिलं, त्यांच्यासोबत गद्दारी; संजय राऊतांच्या हल्लाबोल
  • मोठी बातमी : ठाकरेंच्या 6 फुटीर खासदारांचा गट स्थापन, आता शिंदेंच्या शिवसेनेत विलीन होणार!
  • ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा तापली; ओमराजे निंबाळकर दिल्लीत गेल्याच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
  • केंद्र सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्र पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी 733.28 रुपयांचा निधी मंजूर, मुख्यमंत्र्यांनी मानले आभार
 जिल्हा

वडाळ्यात इंधन चोरीचा पर्दाफाश; अन्न, नागरी पुरवठा विभागाची धडक कारवाई, १.३१ कोटींचा मुद्देमाल जप्त

डिजीटल पुणे    17-06-2026 16:05:33

मुंबई  : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या दक्षता पथकाने वडाळा येथे धडक कारवाई करत पेट्रोल, डिझेल आणि विमान इंधन (एटीएफ) चोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत सुमारे १ कोटी ३१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एका व्यक्तीस ताब्यात घेण्यात आले असून संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.अन्न, नागरी पुरवठा विभागाचे नियंत्रक शिधावाटप चंद्रकांत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १६ जून २०२६ रोजी दक्षता पथकाने वडाळा परिसरात छापा टाकला. कारवाईदरम्यान दोन इंधन टँकरचे सील तोडून त्यातील इंधन प्लास्टिक कॅनमध्ये भरून चोरी केली जात असल्याचे आढळून आले.

दक्षता पथकाने घटनास्थळी एका व्यक्तीस रंगेहाथ पकडले. तपासात २० लीटर क्षमतेच्या प्लास्टिक कॅनमध्ये प्लास्टिक पाईप व व्हॉल्वच्या साहाय्याने इंधन काढले जात असल्याचे उघड झाले. पथकाने तपासणी केलेल्या एमएच-०४ केयू-१८२६ या टँकरमध्ये १० हजार लीटर पेट्रोल आणि १४ हजार लीटर डिझेल, तर एमएच-०४ एलवाय-६३८८ या टँकरमध्ये २९ हजार लीटर विमान इंधन (एटीएफ) असल्याचे आढळून आले.

कारवाईत जप्त करण्यात आलेल्या पेट्रोल, डिझेल व (एटीएफ) इंधनासह संबंधित टँकर आणि अन्य साहित्य असा एकूण १ कोटी ३१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई दक्षता पथकातील उपनियंत्रक शिधावाटप गणेश बेल्लाळे, उपनियंत्रक माधुरी शिंदे, मुख्य निरीक्षण अधिकारी नागनाथ हंगरगे, शिधावाटप अधिकारी गणेश पवार, सहायक शिधावाटप अधिकारी योगेश्वर मोरे तसेच शिधावाटप निरीक्षक रामराजे भोसले, चंद्रकांत कांबळे, विकास नागदिवे, राहुल इंगळे आणि अरुण काते यांनी केली.प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून संबंधितांविरोधात आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून देण्यात आली.


 Give Feedback



 जाहिराती