सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ओमराजेंच्या तोंडाला शेण फासणार, धाराशिवमधील शिवसैनिक आक्रमक, 'ऑपरेशन टायगर' यशस्वी
  • बाळासाहेबांनी ज्यांच्यावर मुलासारखं प्रेम केलं, उद्धवजींनी भावासारखं प्रेम दिलं, त्यांच्यासोबत गद्दारी; संजय राऊतांच्या हल्लाबोल
  • मोठी बातमी : ठाकरेंच्या 6 फुटीर खासदारांचा गट स्थापन, आता शिंदेंच्या शिवसेनेत विलीन होणार!
  • ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा तापली; ओमराजे निंबाळकर दिल्लीत गेल्याच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
  • केंद्र सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्र पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी 733.28 रुपयांचा निधी मंजूर, मुख्यमंत्र्यांनी मानले आभार
 जिल्हा

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील मिसिंग लिंक ब्रिजवर भीषण अपघात; चार वाहनांची साखळी धडक, वाहतूक अर्धा तास ठप्प

डिजीटल पुणे    17-06-2026 17:06:42

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बोरघाट परिसरातील मिसिंग लिंक प्रकल्पाच्या केबल-स्टेड ब्रिजवर मंगळवारी दुपारी भीषण अपघात घडला. पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर चार वाहनांची साखळी धडक झाल्याने काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा गंभीर दुखापत झाली नाही. मात्र, संबंधित वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून पुण्याकडे निघालेल्या फॉर्च्यूनर वाहनाच्या चालकाने अचानक ब्रेक लावून वाहन तिसऱ्या लेनमध्ये थांबवले. यामुळे मागून येणाऱ्या व्हेरना कारला वेळेत ब्रेक लावता न आल्याने ती फॉर्च्यूनरवर आदळली. त्यानंतर मागील आणखी दोन वाहनांनी एकमेकांना धडक दिल्याने साखळी अपघात घडला.

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, एमएसआरडीसीचे कर्मचारी आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या सहाय्याने रस्त्याच्या कडेला हलवण्यात आली. त्यामुळे पुणे लेनवरील वाहतूक सुमारे अर्धा तास विस्कळीत झाली होती.

अपघाताची तीव्रता इतकी होती की, फॉर्च्यूनर वाहन समोरील कारवर चढल्याचे दृश्य घटनास्थळावरील छायाचित्रांमधून स्पष्ट दिसून येत आहे. अपघातानंतर अनेक प्रवासी वाहनांतून बाहेर पडून मदतकार्य करताना दिसले.

दरम्यान, वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना केल्या असून सध्या द्रुतगती मार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे. अपघाताच्या नेमक्या कारणांचा अधिक तपास सुरू आहे.


 Give Feedback



 जाहिराती