सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • निम्मा जून संपला तरी मान्सूनची प्रतीक्षा; 24 जूननंतर कोकण-मुंबईत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता
  • मोठी बातमी: अखेर ओमराजेंसह 6 खासदार फुटले, ऑपरेशन टायगर यशस्वी, ठाकरेंचा व्हिप डावलला, 3 खासदारच उपस्थित!
 DIGITAL PUNE NEWS

काँग्रेसमध्ये विलिनीकरणाच्या भीतीचा दावा; ओमराजेंसह 6 खासदारांचा ठाकरे गटाला रामराम, शिंदे सेनेत जाण्याचा ठराव

डिजीटल पुणे    18-06-2026 15:32:00

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील अंतर्गत घडामोडींना वेग आला असून, पक्षाच्या नऊ लोकसभा खासदारांपैकी सहा खासदारांनी संसदीय दलाच्या बैठकीकडे पाठ फिरवल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पक्षाकडून व्हीप जारी करण्यात आला असतानाही या खासदारांनी बैठकीस अनुपस्थित राहणे, हे ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानले जात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, अनुपस्थित राहिलेल्या खासदारांनी पक्ष नेतृत्वावरील अविश्वास व्यक्त करत एक ठराव मंजूर केला आहे. या ठरावात शिवसेना (उबाठा) भविष्यात काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकते, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. तसेच पक्ष बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेपासून दूर गेल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, या खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याऐवजी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत विलीन होण्याचा निर्णय घेतल्याचा दावा केला आहे. त्याबाबतचे पत्र लोकसभा अध्यक्षांकडे सादर करण्यात आल्याची माहिती संसदीय सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, ठाकरे गटाने बैठकीला गैरहजर राहिलेल्या सहा खासदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू केली असून, त्यांच्याकडून तातडीने स्पष्टीकरण मागवले जाणार आहे. समाधानकारक उत्तर न मिळाल्यास पुढील कायदेशीर कारवाईसाठी लोकसभा अध्यक्षांकडे दाद मागितली जाऊ शकते.राजकीय परिस्थिती तापण्याची शक्यता लक्षात घेऊन संबंधित खासदारांच्या निवासस्थानांबाहेर पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

ठाकरे गटापासून दूर जाणाऱ्या खासदारांमध्ये संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि संजय दिना पाटील यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती