सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • दोन्ही शिवसेनेचा आज वर्धापन दिन; 'ऑपरेशन टायगर'नंतर पहिल्यांदाच शिंदे-ठाकरे आमनेसामने, शक्तिप्रदर्शनाकडे राज्याचे लक्ष
  • सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण, सोने 4 हजारांनी तर चांदी तब्बल 18 हजार रुपयांनी स्वस्त
  • तुळजापूरमध्ये 200 आणि 500 रुपये भरून व्हीआयपी पास घेणाऱ्या भाविकांचं स्वतंत्र दर्शन बंद; सर्व भाविकांना समान अंतरावरून दर्शन
 शहर

मंजुषा नागपुरे यांच्याकडून झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांना अभिवादन; स्मृतिदिनानिमित्त बालगंधर्व येथे कार्यक्रम

डिजीटल पुणे    18-06-2026 16:19:54

पुणे : झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या स्मृतिदिनानिमित्त बालगंधर्व येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या मंजुषा नागपुरे यांनी उपस्थित राहून वीरांगना राणी लक्ष्मीबाई यांच्या शौर्य, स्वाभिमान आणि मातृभूमीप्रती असलेल्या अखंड निष्ठेचा गौरव केला.

कार्यक्रमादरम्यान मॉर्डन गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी ढोल-ताशांच्या गजरात राणी लक्ष्मीबाई यांना मानवंदना अर्पण केली. त्यांच्या शौर्य, त्याग आणि राष्ट्रभक्तीच्या प्रेरणेने संपूर्ण परिसर देशभक्तीच्या वातावरणाने भारावून गेला.

या प्रसंगी उपमहापौर परशुराम वाडेकर, नगरसेवक पुनीत जोशी, मॉर्डन गर्ल्स हायस्कूलचे शिक्षक व विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य, राष्ट्रसेविका समितीच्या स्वयंसेविका तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी उपस्थितांनी झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या पराक्रमाचे स्मरण करत त्यांच्या आदर्शांवर चालण्याचा संकल्प व्यक्त केला.

 

 


 Give Feedback



 जाहिराती