सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • दोन्ही शिवसेनेचा आज वर्धापन दिन; 'ऑपरेशन टायगर'नंतर पहिल्यांदाच शिंदे-ठाकरे आमनेसामने, शक्तिप्रदर्शनाकडे राज्याचे लक्ष
  • सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण, सोने 4 हजारांनी तर चांदी तब्बल 18 हजार रुपयांनी स्वस्त
  • तुळजापूरमध्ये 200 आणि 500 रुपये भरून व्हीआयपी पास घेणाऱ्या भाविकांचं स्वतंत्र दर्शन बंद; सर्व भाविकांना समान अंतरावरून दर्शन
 जिल्हा

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी.

डिजीटल पुणे    19-06-2026 17:28:16

मुंबई : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त २१ जून रोजी मुंबई उपनगर जिल्ह्यात विविध ठिकाणी योग कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, मुख्य कार्यक्रम सौमय्या महाविद्यालय येथे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी सायली जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्यासाठी योगाचे महत्त्व लक्षात घेऊन दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. यावर्षी मुख्य कार्यक्रमासोबतच बोरिवली येथील शैलेंद्र स्कूल आणि विलेपार्ले येथील एन. एम. कॉलेज येथेही योग दिनानिमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी नेहरू युवा केंद्र आणि दीक्षा कदम संस्था यांचे सहकार्य लाभले आहे.

या कार्यक्रमांना लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासनातील अधिकारी, नामांकित खेळाडू तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार आहेत. योगाबाबत जनजागृती व्हावी आणि त्याचा अधिकाधिक प्रसार व्हावा, यासाठी जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये चर्चासत्रे, परिसंवाद आणि कार्यशाळांचे आयोजनही करण्यात येणार आहे.जिल्हा प्रशासनाने नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन योग दिन उत्साहात साजरा करण्याचे आवाहन केले आहे.


 Give Feedback



 जाहिराती