सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा 20 वर्षांनंतर निकाल; पुराव्याअभावी पद्मसिंह पाटीलसह सर्व आरोपी निर्दोष
  • : मोठी बातमी : ओमराजे केस हरताच एकनाथ शिंदेंनी चक्रं फिरवली, अमित शाहांसोबत चर्चा, आता वरिष्ठ न्यायालयात जाणार!
  • आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांसाठी फडणवीस सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय, महसूल विभागाकडून 1 रुपया नाममात्र दराने मिळणार पडीक जमिनी
 क्राईम

पुण्यात धक्कादायक प्रकार! निवृत्त एसीपीवर सुनेचा छळ आणि शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप; ७ जणांविरोधात गुन्हा

डिजीटल पुणे    20-06-2026 12:48:15

पुणे : पुणे शहरातील कोंढवा परिसरातून कौटुंबिक छळाचे एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. एका ३० वर्षीय विवाहितेने आपल्या पती, सासू, नणंदांसह निवृत्त सहायक पोलिस आयुक्त (एसीपी) असलेल्या सासऱ्याविरोधात मानसिक व शारीरिक छळ, धमकी आणि विनयभंगासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर कोंढवा पोलिसांनी कुटुंबातील सात जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचा विवाह एप्रिल २०२२ मध्ये मोठ्या थाटामाटात झाला होता. लग्नानंतर काही काळ सर्व काही सुरळीत सुरू असताना, नंतर सासरच्या मंडळींकडून तिचा छळ सुरू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. महिलेच्या म्हणण्यानुसार, सासूने तिचे दागिने स्वतःच्या ताब्यात घेतले, तर पतीने तिला नोकरी करण्यास विरोध केला. तसेच सोशल मीडियावरील खाती बंद करण्यासाठी दबाव आणण्यात आल्याचाही आरोप तिने केला आहे.

फिर्यादीनुसार, महिलेला अनेकदा घरातच रोखून ठेवण्यात आले. तिच्या आई-वडिलांना भेटण्यासाठी आल्यावर त्यांच्याशीही अपमानास्पद वर्तन करण्यात येत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणातील सर्वात गंभीर आरोप निवृत्त एसीपी असलेल्या सासऱ्याविरोधात करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, त्यांनी आपल्या पोलिस सेवेत असल्याचा धाक दाखवत महिलेवर दबाव आणला. तसेच तिच्याकडे अयोग्य स्वरूपाची मागणी केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. विरोध केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशा प्रकारच्या धमक्या दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

सततच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून संबंधित महिलेने अखेर कोंढवा पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी निवृत्त एसीपी सुरेश घाडगे, त्यांचा मुलगा, पत्नी, दोन मुली आणि दोन जावई अशा एकूण सात जणांविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.दरम्यान, या प्रकरणामुळे पोलिस दलातील माजी वरिष्ठ अधिकाऱ्यावर गंभीर आरोप झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. तपासानंतरच या प्रकरणातील नेमकी वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.


 Give Feedback



 जाहिराती