सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मनोज जरांगेचे लाड बंद करा, त्याला उचला आणि अटक करा, गुणरत्न सदावर्तेंची सरकारकडे मोठी मागणी
  • राजकारण चुलीत गेलं, पण दोन समाज झुंजवणे योग्य नाही; गणरायाच्या साक्षीने मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका
  • मराठ्यांचं पाणी बंद केल्यास आयुक्तांना सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा बीएमसी आयुक्तांना थेट इशारा; म्हणाले, त्यांचं नाव फक्त लिहून ठेवा!
  • जरांगेंचं आंदोलन हा राजकीय अजेंडा, लक्ष्मण हाकेंचा आरोप
  • 'हटणार नाही, इथेच उपोषण करून मेलो तरीही...'; आझाद मैदानात पोहोचताच, मनोज जरांगेंच्या 10 मोठ्या गर्जना
 DIGITAL PUNE NEWS

सरस्वती गारमेंटसच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना स्वयंरोजगाराची चांगली संधी उपलब्ध करणार..... उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील

डिजिटल पुणे    14-06-2025 10:56:53

गारगोटी : सरस्वती गारमेंटसच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना स्वयंरोजगाराची चांगली संधी उपलब्ध होणार असुन शासनस्तरावरून जे सहकार्य लागेल ते आपण देवु असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले.खानापूर ता.भुदरगड  येथे  घेतलेल्या  फैशन डिझाईन कोर्सच्या प्रमाण पत्र वितरण प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमास सौ.अंजली पाटील,सौ.विद्या प्रविणसिंह  सावंत प्रमुख उपस्थित होते.

यावेळी मंत्री पाटील यांनी गारमेंट च्या विविध कामांचा आढावा घेतला.ना.पाटील पुढे म्हणाले की,महिला सक्षम झाल्यातरच घराचीही उन्नती होते त्यामुळे महिलांना स्वावलंबी बनविणे आपले कर्तव्य आहे. राज्य वाहतूक आघाडी उपाध्यक्ष प्रविण सिंह सावंत म्हणाले की, चंद्रकांत दादा नी महिलांच्या उन्नतीचा ध्यास घेतला असुन जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळवुन देण्यासाठी आपण प्रयत्न शील आहोत.यावेळी ना.पाटील यांचे स्वागत पार्थ सावंत यांनी केले तर कार्यक्रमास चंद्रकांतदादा पाटील ,अंजली पाटील  प्रवीणसिंह सावंत ,विद्या सावंत ,वृंदा घाडगे,,पार्थ सावंत ,दत्ता चव्हाण ,दत्ता पाटील,सुशांत मगदूम ,स्वप्निल मांगले सुभाष सुतार ,युवा पाटील ,संजय रेडकर ,सागर नाईक ,कृष्णात गोरे रमेश माने सुरेश पाटील  उपस्थित होते.

गारगोटी... खानापूर येथे सरस्वती गारमेंटसच्या भेटीप्रसंगी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, प्रविण सिंह सावंत,पार्थ सावंत व मान्यवर सरस्वती गारमेंट खानापूर व प्रथम फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने


 Give Feedback



 जाहिराती