सोलापूर : श्री सिद्धेश्वर वैदिक संस्कृत पाठ शाळेच्या विद्यार्थ्यांचा वेद्घोषानंतर अमृ्तेश्वर शिवाचार्य स्वामीजी यांच्या रसाळ वाणीतून अतिशय भक्तिमय वातावरणात शिवमहापुराण कथेस प्रारंभ झाला.शिवनुभव मंगल कार्यालय येथे श्री वीरशैव माहेश्वर वैदिक मंडळ, सोलापूर यांच्यावतीने आणि एस.एस.साबळे वीरशैव ट्रस्ट यांच्या सहकार्याने सकाळी पंचाचार्य ध्वजारोहण आणि कामेश्वर विघ्नेश्वरला रुद्राभिषेक करण्यात आला.
सायंकाळी डॉ पंचाक्षरी शिवाचार्य स्वामीजी (माळकवठा), श्रीकंठ शिवाचार्य स्वामीजी (नागणसूर), सुगुरेश्वर शिवाचार्य स्वामीजी (शहापूर) यांच्या हस्ते शिवमहापुराण कथेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी आमदार विश्वनाथ चाकोते, बसवराज शास्त्री-हिरेमठ, श्री सिद्धेश्वर यात्रेचे मानकारी राजशेखर हिरेहब्बू आदी मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून शिवमहापुराण कथेला प्रारंभ झाला.
निंदा नको शिव नामस्मरण करा जगणं सुंदर होईल -अमृतेश्वर शिवाचार्य स्वामीजी
शिव कथेचा महिमा सांगताना स्वामीजी म्हणाले शिव हा प्रत्येक जिवात आहे. आमची भक्ती निस्सिम असेल त्यांच्यासोबत शिव असतो शिव नामस्मरणाने आत्मशांती व आत्मविश्वास वाढतो आणि आपल्या आयुष्याचा प्रवास सुखद होतो. आयुष्य सुखी होण्यासाठी निंदा नको शिव नामस्मरण करा हे वेगवेगळ्या दृष्टांता द्वारे सांगताना भक्ती संगीताने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. शेवटी मंगला आरतीने आजच्या दिवसाच्या प्रवचनाचे सांगता झाली.
याप्रसंगी वैदिक मंडळाचे संस्थापक डॉ. शिवयोगी शास्त्री-होळीमठ, अध्यक्ष बसवराज पुराणिक, उपाध्यक्ष कल्लय्या शास्त्री-गणेचारी, सचिव विद्यानंद स्वामी, नंदकुमार हिरेमठ, लिंगय्या स्वामी-खंडाळ, परमेश्वर हिरेमठ, बसय्या स्वामी, शिवानंद स्वामी आदी मान्यवर उपस्थित होते.
