सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मनोज जरांगेचे लाड बंद करा, त्याला उचला आणि अटक करा, गुणरत्न सदावर्तेंची सरकारकडे मोठी मागणी
  • राजकारण चुलीत गेलं, पण दोन समाज झुंजवणे योग्य नाही; गणरायाच्या साक्षीने मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका
  • मराठ्यांचं पाणी बंद केल्यास आयुक्तांना सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा बीएमसी आयुक्तांना थेट इशारा; म्हणाले, त्यांचं नाव फक्त लिहून ठेवा!
  • जरांगेंचं आंदोलन हा राजकीय अजेंडा, लक्ष्मण हाकेंचा आरोप
  • 'हटणार नाही, इथेच उपोषण करून मेलो तरीही...'; आझाद मैदानात पोहोचताच, मनोज जरांगेंच्या 10 मोठ्या गर्जना
 राज्य

पोलीस ठाण्यांमधील कार्यरत रोजंदारी सफाई कामगारांसाठी किमान वेतनाबाबत कार्यवाही करावी – गृह राज्यमंत्री योगेश कदम

डिजिटल पुणे    08-08-2025 12:15:53

मुंबई : राज्यातील पोलिस ठाण्यांमधील आस्थापनेवर कार्यरत रोजंदारी सफाई कामगारांसंदर्भात २७ जानेवारी २०१७ च्या शासन अधिसूचनेप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार किमान वेतनाबाबत कार्यवाही करण्यात यावी,  असे निर्देश गृह (शहरे) राज्यमंत्री योगेश कदम यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.राज्यमंत्री योगगेश कदम म्हणाले, राज्यात विविध पोलिस ठाण्यात १८०० रोजंदारी कर्मचारी कार्यरत आहेत. या कामगारांना अन्य विभागामध्ये देण्यात येत असलेले वेतन, भत्ते याप्रमाणे लाभ देण्यात यावे. राज्यातील सर्वच रोजंदारी सफाई कामगारांना समान वेतन असावे. त्यानुसार गृह विभागातील रोजंदारी सफाई कामगारांनाही वेतन देण्यात यावे.

विभागातील कायम असलेल्या सफाई कामगारांना लाड – पागे समितीच्या शिफारशी लागू करण्यात याव्यात. या कामगारांना २०१७ च्या शासन निर्णयानुसार वेतन अदा करताना मागील थकबाकीही देण्याबाबत चर्चा केली असून, कुठल्याही सफाई कामगारावर अन्याय होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश राज्यमंत्री श्री कदम यांनी दिले.बैठकीस पोलिस महानिरीक्षक (प्रशासन) अभिषेक त्रिमुखे, उपसचिव रवींद्र पाटील, महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक संघाचे उदय भट, जीवन सुरुडे आदी उपस्थित होते.


 Give Feedback



 जाहिराती