सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मनोज जरांगेचे लाड बंद करा, त्याला उचला आणि अटक करा, गुणरत्न सदावर्तेंची सरकारकडे मोठी मागणी
  • राजकारण चुलीत गेलं, पण दोन समाज झुंजवणे योग्य नाही; गणरायाच्या साक्षीने मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका
  • मराठ्यांचं पाणी बंद केल्यास आयुक्तांना सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा बीएमसी आयुक्तांना थेट इशारा; म्हणाले, त्यांचं नाव फक्त लिहून ठेवा!
  • जरांगेंचं आंदोलन हा राजकीय अजेंडा, लक्ष्मण हाकेंचा आरोप
  • 'हटणार नाही, इथेच उपोषण करून मेलो तरीही...'; आझाद मैदानात पोहोचताच, मनोज जरांगेंच्या 10 मोठ्या गर्जना
 व्यक्ती विशेष

भाजपकडून नव्या मुंबई अध्यक्षाच्या नावाची घोषणा,ठाकरेंना नडण्यासाठी नवा डाव

डिजिटल पुणे    25-08-2025 14:31:55

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुका काही महिन्यांत जाहीर होण्याची शक्यता असताना भाजपने मोठा निर्णय घेत अमित साटम यांची मुंबई भाजप अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. प्रवीण दरेकर यांच्या नावाची चर्चा असली तरी अखेर साटम यांना संधी देण्यात आली. या बैठकीस रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. भाजपने यंदा मुंबई महापालिका जिंकून आपला महापौर बसवण्याचं स्वप्न ठेवले आहे. शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरे बंधु एकत्र येऊन निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे

मुंबई महापालिका निवडणुका पुढील तीन ते चार महिन्यांत होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी भाजपने संघटनात्मक पातळीवर मोठा बदल करत नवा अध्यक्ष जाहीर केला आहे. प्रवीण दरेकर यांचे नावही अध्यक्षपदासाठी चर्चेत होते, परंतु शेवटी अमित साटम यांची निवड झाली. मुंबई उपनगरातून राजकारण करणारे साटम हे अभ्यासू व आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात.

मुंबई महापालिका म्हटलं की गेल्या अनेक दशकांपासून शिवसेनेचेच वर्चस्व राहिले आहे. मात्र 2022 मध्ये शिवसेनेत झालेल्या फुटीनंतर आता समीकरणे बदलली आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र निवडणूक लढवू शकतात, अशी चर्चा आहे. मराठी मतांची विभागणी होऊ नये म्हणून दोन्ही गट एकत्र येऊ शकतात. या पार्श्वभूमीवर भाजपने स्वतःची ताकद आणखी मजबूत करण्यासाठी नव्या अध्यक्षाची नियुक्ती केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमीत साटम यांची भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) मुंबई युनिटचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्याची घोषणा केली. अमित साटम यांनी विधानसभा आणि विविध व्यासपीठांवर भाजपची बाजू आक्रमकपणे मांडण्याचे काम केले आहे. त्यांना मुंबईकरांच्या प्रश्नांची, मुंबईतील नागरी समस्यांची चांगलीच जाण आहे. याशिवाय भाजपच्या वरिष्ठांच्या ते अतिशयम खास मर्जीतील म्हणून ओळखले जातात. यामुळे अमित साटम यांना मुंबई भाजपच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली असल्याचे बोललं जात आहे.

फडणवीस काय म्हणाले?

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटल, अमित साटम ३ वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत, त्यापूवी ते नगरसेवक होते. पक्षात काम करत असताना त्यांनी अनेक संघटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. अभ्यासू आणि आक्रमक अशी अमित साटम यांची ओळख आहे. मुंबईच्या राजकारणाची जाण आणि कल्पकता त्यांच्याकडे आहे. येत्या काळात त्यांच्या नेतृत्वाखालील भाजप मुंबईत घोडदौड राखेल. अमित साटम सर्व संघटनात्मक जबाबदाऱ्या चांगल्या पद्धतीनं पार पडतील आणि मुंबई महापालिकेत पुन्हा एकदा महायुतीची सत्ता येईल असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

 


 Give Feedback



 जाहिराती