सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मनोज जरांगेचे लाड बंद करा, त्याला उचला आणि अटक करा, गुणरत्न सदावर्तेंची सरकारकडे मोठी मागणी
  • राजकारण चुलीत गेलं, पण दोन समाज झुंजवणे योग्य नाही; गणरायाच्या साक्षीने मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका
  • मराठ्यांचं पाणी बंद केल्यास आयुक्तांना सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा बीएमसी आयुक्तांना थेट इशारा; म्हणाले, त्यांचं नाव फक्त लिहून ठेवा!
  • जरांगेंचं आंदोलन हा राजकीय अजेंडा, लक्ष्मण हाकेंचा आरोप
  • 'हटणार नाही, इथेच उपोषण करून मेलो तरीही...'; आझाद मैदानात पोहोचताच, मनोज जरांगेंच्या 10 मोठ्या गर्जना
 शहर

अनंतराव पवार महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) युनिटची प्रभावी सुरुवात

डिजिटल पुणे    29-08-2025 10:23:02

पिरंगुट : पुणे जिल्हा शिक्षण मंडळ संचलित अनंतराव पवार महाविद्यालय, पिरंगुट येथे २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्र सिग्नल कॉय, राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) चे अनुदानित युनिट सुरू झाले आहे. यामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देशसेवा, शिस्तबद्ध जीवनशैली आणि नेतृत्वगुण विकसित करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.विद्यार्थी निवड प्रक्रियेसाठी उपस्थित अधिकारी यांचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. जी. लोबो यांनी केले. या प्रसंगी एनसीसीचे अधिकारी सुभेदार बालाजी कदम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की –"एनसीसीमुळे विद्यार्थ्यांना देशसेवेची उत्तम संधी मिळते. देशासमोर युद्धसंकट उभे राहिल्यास तुम्ही सज्ज सैनिकाप्रमाणे लढण्यासाठी तयार राहता. \

एनसीसीचे प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, शिस्त, नेतृत्वगुण आणि देशभक्तीची जाणीव अधिक दृढ होते. पोलीस भरतीसह विविध फौजदारी सेवांमध्ये एनसीसी कॅडेटसना विशेष सवलती मिळतात."यावेळी हवालदार निखिलेश साबळे यांच्यासह त्यांनी विद्यार्थ्यांची शारीरिक व लेखी परीक्षा घेतली. या निवड प्रक्रियेसाठी ५३ विद्यार्थी उपस्थित होते, त्यापैकी १७ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये ९ मुलींचा उत्साहवर्धक सहभाग आहे.निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी :मुली : धनश्री थोरात, स्नेहा दिढे, वैष्णवी नागरे, तनवी जाधव, सुचेता कुमारी, अंकिता तीगोटे, सिद्धी दिढे, आराधना हेमडे, शर्वरी लोयरे.मुले : अथर्व दुधळे, हरेश जायभाये, समर्थ जाधव, रोहित वाढे, सुजल बागुल, सोयाम तांबे, पंकज खडके, यश गायकवाड, मुकुल कुमावत, दीपक अंभोरे, प्रथमेश कळमकर.या प्रक्रियेसाठी डॉ. दत्तात्रय भांगे, प्रा. सिद्धार्थ नवतुरे, प्रा. सोनबा धोत्रे, प्रा. गणेश डोके आणि प्रा. दीप सातव यांनी मोलाचे सहकार्य केले.

महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारीही उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.या प्रसंगी प्राचार्य डॉ. बी. जी. लोबो, प्रा. अनिल मरे, प्रा. भरत कानगुडे, डॉ. विजय बालघरे, डॉ. श्रीकांत देशमुख, डॉ. मेघा पाटोळे यांच्यासह महाविद्यालयीन प्राध्यापक उपस्थित होते.एनसीसी युनिटच्या स्थापनेबद्दल पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष मा. राजेंद्र घाडगे, मानद सचिव व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य ॲड. संदीप कदम, खजिनदार ॲड. मोहनराव देशमुख, उपसचिव मा. एल. एम. पवार, सहसचिव (प्रशासन) मा. ए. एम. जाधव यांनी प्राचार्य व महाविद्यालयातील सर्व घटकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.अनंतराव पवार महाविद्यालयात एनसीसी युनिट सुरू झाल्याने महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, विद्यार्थ्यांना देशसेवेच्या दिशेने मार्गक्रमण करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.


 Give Feedback



 जाहिराती