सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मनोज जरांगेचे लाड बंद करा, त्याला उचला आणि अटक करा, गुणरत्न सदावर्तेंची सरकारकडे मोठी मागणी
  • राजकारण चुलीत गेलं, पण दोन समाज झुंजवणे योग्य नाही; गणरायाच्या साक्षीने मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका
  • मराठ्यांचं पाणी बंद केल्यास आयुक्तांना सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा बीएमसी आयुक्तांना थेट इशारा; म्हणाले, त्यांचं नाव फक्त लिहून ठेवा!
  • जरांगेंचं आंदोलन हा राजकीय अजेंडा, लक्ष्मण हाकेंचा आरोप
  • 'हटणार नाही, इथेच उपोषण करून मेलो तरीही...'; आझाद मैदानात पोहोचताच, मनोज जरांगेंच्या 10 मोठ्या गर्जना
 व्यक्ती विशेष

मुंबईत खाऊगल्ल्या बंद ठेवण्याचे आदेश; रोहित पवारांनी राज्य सरकारवर केले गंभीर आरोप

डिजिटल पुणे    29-08-2025 14:00:01

मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लाखो मराठा बांधव मुंबईत दाखल झाले असून आझाद मैदानावर शांततेचे आवाहन करण्यात आले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर हुकुमशाहीचा आरोप करत आंदोलनस्थळी खाऊगल्ल्या बंद ठेवण्याचे पोलिसांचे अलिखित आदेश असल्याचे सांगितले. पवारांनी आंदोलकांसाठी पाणी व स्वच्छतागृहे यांसारख्या सुविधा पुरवल्या नसल्याची टीका केली. सरकारने अडथळे न आणता सोयी उपलब्ध कराव्यात, अन्यथा ही हुकुमशाही मानावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

मराठा आरक्षणाबाबत मुनोज जरांगे पाटलांनी आक्रमक भूमिका घेत मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषणाला सुरुवात केली आहे. मराठ्यांच्या अंगावर गुलाल उधळल्याशिवाय इथून जाणार नाही अशी भूमिका जरांगे पाटलांनी घेतली आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी हजारोंच्या संख्येने आंदोलकांनी उपस्थित लावली आहे. मात्र, त्यांच्यासोबत सरकारने दगाफटका केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. विशेष बाब म्हणजे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी या ट्विटसोबत एक पत्राचा फोटो देखील शेअर केला आहे.

रोहित पवार यांनी ट्विट करत गृहविभाग दगाफटका करत असल्याचा संशय व्यक्त केला आहे. आझाद मैदानाजवळील खाऊ गल्ली बंद करण्यासंदर्भातील न्यू मरिन लाईन्सस (स्टाॅल होल्डर्स) खाऊ गल्ली वेलफेअरचे पत्राचा फोटो रोहित पवारांनी शेअर केला आहे. या पत्रात पोलिसांच्या सूचनेप्रमाणे खाऊ गल्ली बंद ठेवावी, असे म्हटले आहे. दरम्यान, खाऊगल्ल्यांना बंद ठेवण्यामागे गृहविभगाचा हेतू काय? असा प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केला आहे.

मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असेल तर उलट खाऊगल्ल्या सुरु ठेवायला हव्यात, असं रोहित पवार म्हणाले. गृहविभागाने आपले अलिखित फतवे मागे घेऊन तत्काळ खाऊगल्ल्या सुरु करण्यासंदर्भात सूचना कराव्यात, असं रोहित पवारांनी सांगितले.तसेच आंदोलकांची मोठ्या प्रमाणात असलेली संख्या बघता आझाद मैदानावर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे यासारख्या कोणत्याच मुलभूत सुविधा सरकारने उपलब्ध करुन दिलेल्या नाहीत, त्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्याव्यात.


 Give Feedback



 जाहिराती