सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मनोज जरांगेचे लाड बंद करा, त्याला उचला आणि अटक करा, गुणरत्न सदावर्तेंची सरकारकडे मोठी मागणी
  • राजकारण चुलीत गेलं, पण दोन समाज झुंजवणे योग्य नाही; गणरायाच्या साक्षीने मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका
  • मराठ्यांचं पाणी बंद केल्यास आयुक्तांना सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा बीएमसी आयुक्तांना थेट इशारा; म्हणाले, त्यांचं नाव फक्त लिहून ठेवा!
  • जरांगेंचं आंदोलन हा राजकीय अजेंडा, लक्ष्मण हाकेंचा आरोप
  • 'हटणार नाही, इथेच उपोषण करून मेलो तरीही...'; आझाद मैदानात पोहोचताच, मनोज जरांगेंच्या 10 मोठ्या गर्जना
 जिल्हा

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित भजन स्पर्धेला उरण मध्ये उत्तम प्रतिसाद;मंत्री आदितीताई तटकरे यांच्याकडून कार्यक्रमाचे कौतुक

विठ्ठल ममताबादे (प्रतिनिधी )    30-08-2025 10:44:08

उरण : उरण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या उरण विधानसभा मतदार संघ मर्यादित महिला भजन स्पर्धांना उत्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. रविवारी उरणच्या जे एन पी ए वसाहतीतील बहू उद्देशिय सभागृहात घेण्यात आलेल्या या भजन स्पर्धेच्या निमित्ताने अनेकांची सुप्त कलाकारी देखील अनुभवायला मिळाली. त्यामध्ये अवध्या १० वर्षांच्या एका चिमुकल्या तबला वादकाने सर्वांचे लक्ष वेधले.राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मागील अनेक महिने जिल्हाभरात विविध कार्यक्रम सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून उरण तालुक्यात देखील या स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये तब्बल १३ विविध भजनी मंडळांनी सहभाग नोंदवला होता. सकाळी ९ वाजता सुरू झालेली ही स्पर्धा संध्याकाळी ७ वाजेपर्यंत चालली.

या स्पर्धेच्या ठिकाणी राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाच्या कॅबिनेट मंत्री ना. आदितीताई तटकरे यांनी भेट देऊन आयोजकांचे कौतुक केले.उपस्थित सर्व मान्यवरांचे भारती समाधान कटेकर यांनी पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन स्वागत व सत्कार केला.यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून महिला जिल्हाध्यक्ष उमाताई मुंडे, जासई हायस्कूलच्या प्राध्यापिका सुलोचना सुरेश पाटील, अपूर्वा पतसंस्था अलिबागच्या अध्यक्षा ऍड. कविता प्रवीण ठाकूर उपस्थित होत्या.आपल्या भाषणात मंत्री आदितीताई म्हणाल्या की आमचा आज सर्वात जास्त नामस्मरण झाला आहे. हे खरेच भाग्याचे आहे. उरण तालुक्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देते. स्पर्धेकांना उद्देशून त्या म्हणाल्या कि या सादरकिरणातून आपण आपली परंपरा जोपासत आहोत हे खूप छान आहे. आपल्या कलेच्या माध्यमातून समाजासमोर कसे पोहोचतो ते खूप महत्वाचे आहे. बक्षिसे कोणाला मिळतील यापेक्षा आज सादर होत आहेत ती भजने आमच्या दृष्टीने सर्वोत्तमच आहेत. त्यामुळे आमच्या दृष्टीने सर्वच मंडळे उत्तम आहेत असे त्यांनी सांगितले.

या भजन स्पर्धा आयोजनात उरण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. त्यामध्ये तालुका अध्यक्ष परिक्षित ठाकूर, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर, माजी जिल्हा परिषद सदस्या कुंदाताई वैजनाथ ठाकूर, माजी अध्यक्ष मनोज भगत, शहर अध्यक्ष तुषार ठाकूर,शहर उपाध्यक्ष सुमिता तुपगावकर,श्री गुरुकृपा संगीत परिवारचे अध्यक्ष सुप्रिया घरत, तुषार घरत यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. या निमित्ताने मंत्री आदितीताईंनी एक घोषणा केली असून यावर्षी ज्या काही सर्वच तालुक्यात तालुका स्तरीय भजन स्पर्धा झाल्या आहेत. त्यांच्यातील विजेत्यांच्या साठी आपण पुढील वर्षी जिल्हास्तरीय स्पर्धा ठेवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. त्यांच्या घोषणेचे स्पर्धकांनी उत्स्फुर्तपणे स्वागत केले. या स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक आई भवानी प्रासादिक भजन मंडळ सांताकृझ पुर्व यांना मिळाला असून गायिका कु. ऋतिका मुरूडकर या होत्या.

द्वितिय क्रमांक आई एकविरा महिला भजन मंडळ दुंदरेपाडा यांना मिळाला असून गायिका सुजाता पाटणकर या होत्या. तृतिय क्रमांक ओम साई भजन मंडळ खरसुंडी खालापूर यांना मिळाला असून त्यांच्या गायिका हर्षदा सालेकर या होत्या तर उत्तेजनार्थ पारितोषिक श्री. कृष्ण प्रासादिक भजन मंडळ कुडूस अलिबाग यांना मिळाला असून त्यांच्या गायिका पुजा पाटील या होत्या. स्पर्धेत उत्कृष्ट तबलावदक म्हणून ओमकार कराळे यांना घोषित करण्यात आले तर उत्कृष्ट गायिका म्हणून पुनम आगरकर यांना गौरविण्यात आले. या संपुर्ण स्पर्धेचे परिक्षण माऊली सावंत, ओम बोंगाडे आणि  भाग्यश्रीताई देशपांडे यांनी केले.उरण तालुक्यात भजन स्पर्धेचे पहिल्यांदाच आयोजन केले गेल्याने समस्त भजन मंडळ, भजन प्रेमी, अध्यात्मिक भाविक भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते. सुप्रिया घरत, तुषार घरत यांनी सुंदर व उत्तम असे कार्यक्रमाचे आयोजन,नियोजन केल्याने सर्व जनतेनी त्यांचे व आयोजकांचे आभार मानले आहेत.


 Give Feedback



 जाहिराती