सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मनोज जरांगेचे लाड बंद करा, त्याला उचला आणि अटक करा, गुणरत्न सदावर्तेंची सरकारकडे मोठी मागणी
  • राजकारण चुलीत गेलं, पण दोन समाज झुंजवणे योग्य नाही; गणरायाच्या साक्षीने मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका
  • मराठ्यांचं पाणी बंद केल्यास आयुक्तांना सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा बीएमसी आयुक्तांना थेट इशारा; म्हणाले, त्यांचं नाव फक्त लिहून ठेवा!
  • जरांगेंचं आंदोलन हा राजकीय अजेंडा, लक्ष्मण हाकेंचा आरोप
  • 'हटणार नाही, इथेच उपोषण करून मेलो तरीही...'; आझाद मैदानात पोहोचताच, मनोज जरांगेंच्या 10 मोठ्या गर्जना
 जिल्हा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन

डिजिटल पुणे    30-08-2025 17:09:56

मुंबई :  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज मुंबईतील मानाच्या गणपतींपैकी एक असलेल्या लालबागच्या राजाचे सहकुटुंब दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या हस्ते ‘श्रीं’ची पूजा करण्यात आली.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार, पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार रवींद्र चव्हाण, अमित साटम, स्थानिक लोकप्रतिनिधी आदी उपस्थित होते.

दरम्यान, लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी सपत्नीक आरती गणरायाची आरती केली. तर मिळालेली माहितीनुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज दुपारच्या सुमारास वांद्रे पश्चिम येथील मंत्री आशिष शेलार यांच्या गणपती मंडळात दर्शनासाठी येणार आहेत. मंत्री आशिष शेलार यांच्याकडून आयोजित गणपती मंडळात दर्शनासाठी ते येणार आहेत.

सध्या मुंबईच्या दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अंधेरीत पहिल्यांदा गणपती मंडपात बाप्पाचे दर्शनासाठी येत असल्यामुळे अंधेरीकरांमध्ये मोठा उत्साह आहे. अमित शाह शनिवारी दुपारी दीड वाजता अंधेरी पूर्वेत ओल्ड नागरदास रोडवर असलेल्या मोगरेश्वर सार्वजनिक गणपती मंडपात विराजमान बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी येत आहेत.

श्री मोगरेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून मागील 30 ते 35 वर्षापासून गुजरात राज्याचे राज्यमंत्री पुरुषोत्तम भाई सोलंकी यांच्याकडून गणपती बाप्पा विराजमान होत आहे. मोगरेश्वर गणपती मंडपात बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी गणेश भक्तांची कालपासूनच मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार मुरजी पटेल आणि पुरुषोत्तम भाई सोलंकी गुजरात राज्याचे राज्यमंत्री यांच्या प्रयत्नाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गणपती बाप्पाचे दर्शनासाठी पहिल्यांदा अंधेरीत येत आहेत.

 

 


 Give Feedback



 जाहिराती