सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ब्लॅकआऊटवेळी हॉस्पिटलसोबत समन्वय यंत्रणा उभी करा. टार्गेट होऊ नये म्हणून लाईट बंद केले जातात, त्यामुळे पर्यायी विद्युत व्यवस्थेद्वारे यंत्रणा सुरू ठेवून, गडद रंगाचे पडदे अथवा गडद रंगाच्या काचा वापरून त्याचवेळी बाहेरून लाईट दिसणार नाही, अशी व्यवस्था करा.
  • पोलिस विभागाने नेहमीपेक्षा जास्त जागरूकता ठेवावी. देशद्रोही व्यक्तींच्या कारवाया वाढण्याची शक्यता पाहता अधिक कोंबिग ऑपरेशन करा आणि गस्त अधिक चोख करा.
  • प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांच्या सायबर सेलने समाजमाध्यमांवर देखरेख ठेवत पाकिस्तानला मदत करणारे हॅण्डल ओळखून त्यावर कारवाई करा. शत्रूला मदत करणारी अथवा चुकीची माहिती कुणी प्रसारित करीत असेल तर त्यावर कारवाई करा.
  • ब्लॅकआऊट म्हणजे काय आणि अशावेळी काय करावे, यांचे व्हिडिओ विद्यार्थी, नागरिकांपर्यंत पोहोचवा. व्यापक जनजागृती करा.
  • राज्यातील महत्वाच्या पदांवर विशेषतः आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन इत्यादी विभागांतील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
  • भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला.
  • भारत-पाकिस्तानमध्ये तणाव! पुण्यात ‘श्रीमंत’ दगडूशेठ गणपती’ मंदिराच्या सुरक्षेत मोठी वाढ
  • मुंबई-पुण्यात हाय अलर्ट जारी! नौदलाकडून मच्छिमारांना महत्वाच्या सूचना
  • चंदीगढमध्ये हवाई दल स्थानकाजवळ सायरन वाजवण्यात आले असून नागरिकांना घरात राहण्याचा आणि बाल्कनीपासून दूर राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
  • भारत-पाक संघर्षाचा शेअर बाजाराला दणका ! सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये; रिलायन्स, टाटा स्टॉक्सही घसरले
  • भारताशी पंगा घेणं अंगलट; पाकिस्ताननं असीम मुनीरलाच उचललं; लष्कर प्रमुखपदावरुन हटवलं? देशद्रोहाचा गुन्हाही दाखल ...
  • मुंबईच्या साकीनाका परिसरात संशयास्पद ड्रोनच्या घिरट्या, पोलीस सतर्क; कोम्बिंग ऑपरेशनला सुरुवात..
  • मोठी बातमी!! अखेर IPL स्पर्धा स्थगित; BCCI चा मोठा निर्णय
  • परराष्ट्र मंत्रालय पत्रकार परिषदेतेतील ठळक मुद्दे पाकीस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द ४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडून जाण्याचे आदेश भारताने सिंधू पाणी करारास स्थगिती अटारी वाघा बॅार्डर १ मे पर्यंत बंद
 DIGITAL PUNE NEWS

आनंद किंवा सुख यांच्या मागे न लागता स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवता आले तर ताण-तणावाचे व्यवस्थापन करताना मनाचा तोल ढासळला जात नाही - सौ. उमा रविंद्र मठपती

डिजिटल पुणे    14-03-2025 15:13:11

विषय : व्यवस्थापन ताण-तणावाचे*

आधुनिकतेचा स्वीकार करून पुढे मार्गस्थ होताना, बदलत्या जीवनशैलीचा अंगीकार करताना मनाची होणारी अवस्था म्हणजे ताण.मनाच्या या संभ्रमित अवस्थेचा मनाबरोबर शरीरावर होणारा परिणाम म्हणजे तणाव होय.पुर्वी अन् सध्या या दोन परिस्थितीचा विचार करताना येणाऱ्यां निराशेचे प्रमाण वाढते .ती निराशा म्हणजे चिंता होय. अशी ही चिंता मनाला जाळत ,वाढतच जाते, कधीही कमी न होण्यासाठी ,कारण यावर उपाय हा कुठेही नाही . परंतु मनावर थोडसं नियंत्रण मिळवून आयुष्यास योग्य आयाम देणे व बदलास स्वीकारून जगण्यास सामोरे जाणे म्हणजेच व्यवस्थापन होय . व्याख्या सोपी वाटली तरी अंमलात आणण्यात बरीच कठीण आहे.

 स्त्रियांच्या बाबतीत ताण - तणाव व्यवस्थापन या संदर्भात बरीच समीकरणे चुकीची ठरतात .याचं मुख्य कारण म्हणजे पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या रुढी, परंपरा होय. अगदी बाल्यावस्थेपासून मिळणारी वागणूक ही अंतर्मुख करते .जसजसं वय वाढत जातं तसं तशी मिळणारी वागणूक मनाची दुरावस्था करून जाते. सावरण्याची मनस्थिती ही कोंडमाऱ्यात परिवर्तित होते. त्यामुळे भूतकाळातील वागणूक वर्तमान काळात मिळणाऱ्या वागणुकीशी साधर्म्य शोधते .काय करू शकते, काय नाही हे समाज व्यवस्थेत ग्राह्य धरले जात नाही. ग्राह्य धरलं जातं ते ती एक स्त्री आहे आणि ती तेवढी सक्षम असू शकत नाही.

 काळ बदलला समाज व्यवस्थेत परिवर्तन आलं. काही पुढारलेल्या विचारांच्या मान्यवरांनी स्त्रियांना सम-समान अधिकार देऊ केला. शिक्षणामुळे मानसिकता बदलली. स्त्री शिकू लागली . पुरुषांच्या बरोबरीनं काम करू लागली. हे जरी मान्य असलं तरी तिने काय करावं ,काय शिकावं, कोणत्या प्रकारचे शिक्षण घ्यावं हे आजही सर्वस्वी तिच्या घरातल्या वरिष्ठांवर अवलंबून असते. नावडत्या क्षेत्रात शैक्षणिक वाटचाल करताना येणारा ताण हा ना ती सांगू शकते ,ना या विरुद्ध जाऊन स्वतःच निर्णय घेऊ शकते. हा तणाव तिच्या मनामध्ये घर करून बसतो.

शिक्षण घेऊन नोकरी करताना येणाऱ्या सर्व समस्यांपैकी मुख्य गोष्ट म्हणजे, नोकरी बरोबर तितक्याच संयमाने आणि सक्षमतेने घराची जबाबदारी पार पाडावी लागते .यावेळी घरातल्या प्रत्येकाचं मन, आवड,निवड सांभाळत बाहेर काम करणं म्हणजेच तारेवरची कसरत होय. जितक्या आत्मीयतेने ती जबाबदाऱ्या पार पाडते, तितक्याच उपरोधिक भावनेने ती फक्त गृहीत धरली जाते. हा ताण खूप मोठा आहे. बऱ्याच वेळा यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण होते आणि मनाला व पर्यायाने शरीराला ही तणावग्रस्त वातावरण मिळते. जसे अति ताणा मुळे धावपळ करताना होणारी चिडचिड ,बारीक गोष्टीवरून वाद विवाद, काहीतरी विसंगत बोलणे ,विसरणे, नैराश्य, वैफल्य, अस्वस्थ वाटणे गोंधळणे तत्सम गोष्टी घडू लागतात.

 इतका ताण- तणावग्रस्त वातावरणात ही स्त्री अजूनही खंबीरपणे वावरू शकते. याचं कारण म्हणजे ताण-तणावाचं ती योग्य प्रकारे व्यवस्थापन करते आहे. शिक्षणामुळे तिला ही बदलत्या घडामोडीचा स्वीकार करण्याची मानसिकता पटू लागली आहे. प्रत्येक गोष्टीसाठी नियोजनात्मक वेळ, कामांमध्ये सुसूत्रता राखणे तिला सहज शक्य होऊ लागले आहे .पूर्वी आर्थिक दृष्ट्या सबळ नसलेली ती, आता स्वतःसाठी राखून उर्वरित देऊन टाकण्याचे मनोबल तयार करू लागली आहे .कुटुंबाच्या आवडी ,निवडी जपत असताना काही क्षण ती स्वतःचा विचार करते आहे.थोडासा व्यायाम ,सकस आहार, सारासार विचार करून निर्णय घेण्याची क्षमता वाढवते आहे .वेळ काढून चांगली पुस्तकं वाचल्याने ती स्वतः चे मनोधैर्य स्वतः सांभाळत आहे. प्रेरणात्मक जगण्यास प्राधान्य देते आहे .आजची स्त्री भूतकाळात घडणाऱ्या घटनांनी स्वतःचा वर्तमान सावरायला शिकतेय ते ताण- तणावाचे योग्यरित्या व्यवस्थापन करूनच. तणावमुक्त जगण्यासाठी काही नियम काटेकोरपणे पाळताना दिसत आहे. मुळातच व्यसनापासून खूप लांब असणारी स्त्री ही स्वतःला निश्चितपणे सावरू लागलेली आहे.

बाळबोध अवस्थेपासून मनावर बिंबविलेल्या काही गोष्टींमुळे तिचे  मन हे त्या - त्या प्रसंगाचा स्वीकार करण्याच्या वृत्तीचा कल असतो. त्यामुळे फारसा विचार न करता कर्म करण्याला प्राधान्य ती देते. उद्याची चिंता डोक्यात न घोळता आल्या प्रसंगाला तोंड देण्याची धमक तिच्यात असते .बदल सहज स्वीकारते .जे मिळेल किंवा वाट्याला येते त्यावरून स्वतःची मानसिकता ठाम करते काय करावे, नी कसे करावे, किती स्वीकारावे व किती सोडून द्यावे यामुळे स्त्रियांमध्ये ताण -तणावाची व्यवस्थापन सहज होताना दिसते.

यावरून एक निष्कर्ष काढता येतो की ,आनंद किंवा सुख यांच्या मागे न लागता स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवता आले तर ताण-तणावाचे व्यवस्थापन होताना  मनाचा तोल ढासळला जात नाही .अति खाण्याने जसे शरीराची अवस्था खराब होते, अपचन, मळमळ, पोट खराब होणे या गोष्टी घडतात. तसेच मनाच्या बाबतीतही आहे. अति ताण - तणाव घेतल्याने सारासार विचार करण्याची क्षमता नष्ट होते. भूत भविष्याच्या तुलनात्मक विचारांमध्ये वर्तमान खराब होतो; हे जाणून स्त्री ही ताण-तणावात जगून जगण्यातला आनंद घालविण्यापेक्षा लहान लहान गोष्टींमध्ये तडजोड करून आनंद शोधून जगण्याचे सार्थक करते.

 सौ. उमा रविंद्र मठपती 

सोलापूर रोड बार्शी 


 Give Feedback



 जाहिराती