सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • परराष्ट्र मंत्रालय पत्रकार परिषदेतेतील ठळक मुद्दे पाकीस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द ४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडून जाण्याचे आदेश भारताने सिंधू पाणी करारास स्थगिती अटारी वाघा बॅार्डर १ मे पर्यंत बंद
 जिल्हा

केळवणे को ए. सो. हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात संपन्न

विठ्ठल ममताबादे (प्रतिनिधी )    17-03-2025 17:07:20

उरण : केळवणे येथे रविवार १६ मार्च २०२५ रोजी १९८२ ते २०२४ पर्यंतच्या माजी विद्यार्थी संघटनेचा मेळावा मोठया उत्साहात संपन्न झाला.या मेळाव्यात प्रत्येक विद्यार्थी आपले राजकीय पक्ष बाजूला ठेऊन यामध्ये सामील झाले.या मेळावा कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे चेअरमन वि.ना.कोळी होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून  शाळेच्या १९८५ बॅचचे मुख्यद्यापक मोकल सर,म्हात्रे सर, व ग्रामपंचायत सरपंच  गुरुराज ठाकूर,ग्रामपंचायत सदस्य  कुमार पाटील,शाळा समिती डॉ. देविदास शिवकर, आशिष घरत, तसेच १२० माजी विद्यार्थी उपस्थित होते

को. ए. सो. केळवणे हायस्कूलची जुनी इमारत मोडकळीस आली असून तिथे नवीन इमारत बांधण्याचा संकल्प एस एस सी च्या  ४२ बॅचेसच्या या माजी विद्यार्थ्यांनी केला असून काही  विद्यार्थ्यांनी सढल हाताने या इमारतीसाठी  देणगी स्वरूपात तर काहींनी वस्तू स्वरूपात देण्यासाठी पुढे आले आहेतत्यामुळे गावाला एक चांगली शाळा मिळेलच परंतु उद्याच्या नवीन पिढीला त्यांच्या  उज्वल भविष्यासाठी लवकरच जुनियर कॉलेज मिळेल अशी ग्वाही शाळा समितीचे सदस्य देविदास शिवकर यांनी दिली.सर्वांच्या सहकार्याने हा मेळावा मोठया उत्साहात साजरा झाला.


 Give Feedback



 जाहिराती