सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • परराष्ट्र मंत्रालय पत्रकार परिषदेतेतील ठळक मुद्दे पाकीस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द ४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडून जाण्याचे आदेश भारताने सिंधू पाणी करारास स्थगिती अटारी वाघा बॅार्डर १ मे पर्यंत बंद
 शहर

श्री देवदर्शन यात्रा समिती, पुणे च्या वतीने श्री मराठी हस्तलेखन समिक्षा चे पारितोषिक वितरण संपन्न...

डिजिटल पुणे    17-03-2025 17:43:59

पुणे : भक्तिमय विचारधारणेतून संघटित युवा शक्ती "श्री देवदर्शन यात्रा समिती, पुणे" च्या वतीने मराठी राजभाषा दिनाचे महत्व प्रगल्भित करण्याच्या हेतूने आयोजित केल्या गेलेल्या "मराठी हस्तलेखन समिक्षा" मध्ये सहभागी झालेल्या "ऑल इंडिया मुव्हमेंट फॉर सेवा" संस्था संचलित मु.पो. पांगरी, राजगुरुनगर येथील निराधार विद्यार्थी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निर्धारित पारितोषिके प्रदान करण्यात आली.


समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विद्यार्थ्यांना चित्रपटगृहात दाखविण्यात आलेल्या "हिंदवी स्वराज्य संरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज" यांच्या जीवनपटावर आधारित "छावा" या चित्रपटाचा सारांश आणि तो कसा वाटला या विषयावर विद्यार्थ्यांनी आपल्या भावना हस्तलिखित केल्या. त्यांच्या हस्तलिखित साहित्याचे परीक्षण करून समितीने कु. सचिन अरविंद धायगुडे, कु. कुबेर कैवल्य रामेश्वर, कु. आयुष गणेश करपे यांस उत्तेजनार्थ, कु. कार्तिक दत्तात्रय नरोडे यांस चतुर्थ, कु. कृष्णा राकेश खैरनार यांस तृतीय, कु. संतोष माहादू घोडके यांस द्वितीय, आणि कु. गणेश अरविंद धायगुडे यांस प्रथम अशी पारितोषिके प्रदान करण्यात आली. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे आणि सर्वांना सुदृढ शरीरयष्टी जपण्या करीता उपयुक्त असे क्रीडा साहित्य भेट म्हणून प्रदान करण्यात आली.


सदरील कार्यक्रमा प्रसंगी समिती सदस्यांनी आपण कार्यरत असलेल्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची माहिती आणि कार्य अनुभव विद्यार्थ्यांसमोर विषद केले. निराधार विद्यार्थ्यांच्या या वसतीगृहाला वस्तुरुपी किंवा आर्थिक सहकार्य अनेकांकडून प्राप्त होते. परंतु वैचारिक दृष्टिकोन समोर ठेऊन समितीने दाखविलेला चित्रपट, मराठी हस्तलेखनाची पारितोषिके आणि  प्राथमिक शिक्षण घेता घेता आपल्या भविष्याचा वेध घेता यावा या हेतूने विद्यार्थ्यांसमोर मांडलेले आपले विचार अतिशय कौतुकास्पद आहेत असे संस्थेचे संचालक ज्ञानेश्वर बुरकुल, गजानन शेळके आणि संस्थेचे हितचिंतक जयवंत लोथे यांनी नमूद केले. 


समितीचे सदस्य प्रविण देवकर, हर्षद पोरे, विजय भांबुरे, सुधीर साकोरे, केतन सांडभोर, मनोज घुमटकर, प्रदीप मुंगसे, ओमकार पऱ्हाड, विजय गाडेकर, आणि राहुल कदम यांनी या प्रसंगी विद्यार्थ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारत त्यांच्या आवडी निवडी संदर्भात विचारपूस केली.
समितीने आयोजित केलेल्या या नावीन्यपूर्ण कार्यक्रमास उत्स्फूर्त सहकार्य करत संस्थेच्या सेवकांनी विद्यार्थ्यांच्या वतीने समितीचे कौतुक केले. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही अर्पित केल्या.


धन्यवाद...!!

आपले विनीत:
श्री देवदर्शन यात्रा समिती, पुणे


 Give Feedback



 जाहिराती