"व्यवस्थापन ताणतणावाचे"
महिलांना कार्यक्षेत्रात आणि त्यांच्या व्यक्तिगत जीवनात अनेक वेगवेगळ्या ताणतणावांचा सामना करावा लागतो. महिलांवर सामाजिक आर्थिक शैक्षणिक आणि कारणांमुळे ताणाची स्थिती निर्माण झाल्याने प्रत्येक महिलेने आपल्या कुवतीनुसार येणाऱ्या प्रसंगाला सामोरे जावे. विशेषतः व्यवस्थापन क्षेत्रात ज्या महिला काम करत असतान त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते.चला तर मग पाहूया, महिलांना कशा प्रकारच्या ताणतणाव येतो आणि येणाऱ्या प्रत्येक अडचणींवर महिला कशा प्रकारे मात करतात.
महिलांना समाजात अनेक वेळा अपेक्षा. आणि तणावांचा सामना करावा लागतो. प्रत्येक महिलेचे स्वप्न असते आपण एक चांगली गृहिणी, माता आणि एक यशस्वी करिअर वुमन व्हावे असे वाटत असते. ह्या दोन्ही सांभाळणे मात्र खूप अवघड आहे.त्यातच समाजातील रुढीवादी विचारधारा आणि स्त्रियांच्या कामांबाबत असलेल्या कठोर नियमांमुळे महिलांना ताण येतो.
महिलांसाठी आर्थिक स्वतंत्रता हा एक मोठा मुद्दा आहे. ज्या महिला घरकाम करतात किंवा कमी पंगाराची नोकरी करतात अशा महिलांना आर्थिक ताण मोठ्या प्रमाणावर येतो, आर्थिक ताणतणाव मुळे स्थिरतेचा अभाव, घर खर्च आणि कुटुंबासाठीच्या जबाबदाऱ्या यामुळे महिलांना आर्थिक ताणाचा सामना करावा लागतो.
शिक्षण क्षेत्रात आणि करिअर क्षेत्रात महिलांना अनेक वेळा समाजाच्या अपेक्षांच्या विरोधात संघर्ष करावा लागतो.शालेय शिक्षण, उच्च शिक्षण आणि नोकरीत उत्कृष्टतेच्या प्राप्तीसाठी महिलांना निरंतर संघर्ष करावा लागतो. शिक्षणाच्या अभावामुळे किंवा त्यासाठी लागणारे साधन उपलब्ध नसल्याने महिला वर्गासाठी एक मोठा ताण निर्माण होतो.
महिलांना त्यांच्या कुटुंबाचे पालनपोषण मुलांचे संगोपन, घरातील कामे आणि कामकाज आणि यामधील समतोल राखता यायला हवा.घर आणि काम दोन्ही व्यवथापित करत असताना महिलाना मोठ्या प्रमाणात ताण येतो. महिलांना हे सगळ करताना तारेवरची कसरत करावी लागते. विशेषतः मुलांच्या शाळेतील कार्यक्रम , घरातील मोठ्याव्यक्तींची काळजी आणि इतर कुटुंबीयांची अपेक्षा यामुळे महिलांना मानसिक आणि शारिरीकदृष्ट्या मोठ्या प्रमाणावर ताण येतो.
महिलांनी आपल्याला येणार ताण कमी करण्यासाठी सर्व प्रथम स्वःताची काळजी घेणे गरजेचे आहे. महिलांनी शारीरिक आणि मानसिक स्वस्थ्याकडे लक्ष देणे खूप महत्त्वाचे आहे. महिलांनी स्वःतहासाठी वेळ काढणे खूप गरजेचे आहे. महिलांनी योगा करणे, ध्यान धारणा करणे, नियमित व्यायाम तसेच चांगली झोप घेणे यांमुळे महिलांचा ताण होण्यास मदत होऊ शकते. प्रत्येक महिलेने स्वतःचे आत्मपरिक्षण करून स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे.
महिलानी आपले कुटुंब आणि समाजाच आधार घ्यावा. कुटुंबीयांचे सहकार्य, विशेषत: पुरुष वर्गाची घरकामांमध्ये मदत हयावी, यामुळे महिलांचा ताण कमी होण्यास मदत होऊ शकते. त्यांच्या कार्यक्षेत्रातही चांगल्या सहकार्याचे वातावरण असणे आवश्यक आहे.
महिलांनी संवाद साधण्याची कला आवगत केली पाहिजे. कामाच्या ठिकाणी घरात, समाजात मनमोकळेपणाने न घाबरता संवाद साधल्याने महिलांचा ताण कमी होऊ शकतो. महिलांकडे स्वतःचे विचार स्पष्टपणे मांडण्याची कला असली पाहिजे.प्रत्येक महिलेने स्वतःच्या विचारांवर आणि मतांवर ठाम राहायला शिकले पाहिजे,
महिलांनी स्वतःवर विश्वास ठेवावा आणि स्वतःच्या क्षमतांवर लक्ष केंद्रित करावे महिलांनी आपल्य ज्या कार्यक्षेत्रात काम करत आहोत त्या कार्यक्षेत्रत उत्कृष्टता मिळवण्यासाठी योग्य प्रशिक्षण आणि प्रेरणा घेत राहावी.
महिलांनी आपल्याला ज्या गोष्टींमुळे टॅन येतो व ताणतणावाची स्थिती निर्माण होते. अशा परिस्थितीचा सामना करायला शिकले पाहिजे, मानसिक आणि शारीरिक ताण कमी करण्यासाठी योग्य उपाय शोधले पाहिजेत.
आपल्या समाजात आजही बरयाचशा महिला कुटुंब आणि काम या दोन्ही जबाबदाऱ्या व्यवस्थित पणे पार पाडतात. अनेक महिला आपला ताणतणाव कमी करण्यासाठी छोटी-छोरी विश्रांती होऊन आपले कुटुंब तसेच मित्र-मैत्रीण यांच्या सोबत वेळ घालवून, संवाद साधून त्यांचा ताण कमी करतात.
महिलांना सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि कौटुंबिक परिस्थिती या ताणतणावांचा सामना करण्यासाठी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे, संवाद कौशल्ये विकसित करणे तसेच कुटुंब आणि समाजाचा आधार होऊन ताण कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. महिलांचे सामर्थ्य, धैर्य आणि आत्मविश्वास हेच त्यांना यशाच्या दिशेने मार्गदर्शन करतील.
"शेवटी मी एवढेच सांगेन ,
लढता लढता हरलीस तरी,
हरल्याची खंत करू नकोस
लढ तू स्वतःसाठी स्वत:च्या मानसन्मान साठी
लढाईला तुझ्या अंत नाही,
पुन्हा ऊठ आणि ने पुन्हा लढ,
घे तू गगनभरारी"
नाव: सौ. स्वाती भाकर जंगम
पत्ता - घर नं ४/४४१ वा शंकर गोविंद ,वरळीकर चाळ वरळीकर कोळीवाडा मुंबई :- 30
ई मेल:- jangarmswati [email protected]