सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अखेर युद्ध थांबलं, भारत-पाकिस्तान दोन्ही देशांकडून युद्धबंदीला संमती!
  • पाकिस्तान हादरला! उपपंतप्रधान इशाक बॅकफूटवर म्हणाले, “भारत थांबला तर आम्हीही मागे हटू”
  • भारत आणि पाकिस्तानने पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
  • पाकिस्तानच्या गोळीबारात जम्मू काश्मीरचे आयुक्त राजकुमार थापांचा मृत्यू; दोन कर्मचारी गंभीर जखमी
  • ब्लॅकआऊटवेळी हॉस्पिटलसोबत समन्वय यंत्रणा उभी करा. टार्गेट होऊ नये म्हणून लाईट बंद केले जातात, त्यामुळे पर्यायी विद्युत व्यवस्थेद्वारे यंत्रणा सुरू ठेवून, गडद रंगाचे पडदे अथवा गडद रंगाच्या काचा वापरून त्याचवेळी बाहेरून लाईट दिसणार नाही, अशी व्यवस्था करा.
  • पोलिस विभागाने नेहमीपेक्षा जास्त जागरूकता ठेवावी. देशद्रोही व्यक्तींच्या कारवाया वाढण्याची शक्यता पाहता अधिक कोंबिग ऑपरेशन करा आणि गस्त अधिक चोख करा.
  • प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांच्या सायबर सेलने समाजमाध्यमांवर देखरेख ठेवत पाकिस्तानला मदत करणारे हॅण्डल ओळखून त्यावर कारवाई करा. शत्रूला मदत करणारी अथवा चुकीची माहिती कुणी प्रसारित करीत असेल तर त्यावर कारवाई करा.
  • ब्लॅकआऊट म्हणजे काय आणि अशावेळी काय करावे, यांचे व्हिडिओ विद्यार्थी, नागरिकांपर्यंत पोहोचवा. व्यापक जनजागृती करा.
  • राज्यातील महत्वाच्या पदांवर विशेषतः आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन इत्यादी विभागांतील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
  • भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला.
  • भारत-पाकिस्तानमध्ये तणाव! पुण्यात ‘श्रीमंत’ दगडूशेठ गणपती’ मंदिराच्या सुरक्षेत मोठी वाढ
  • मुंबई-पुण्यात हाय अलर्ट जारी! नौदलाकडून मच्छिमारांना महत्वाच्या सूचना
  • चंदीगढमध्ये हवाई दल स्थानकाजवळ सायरन वाजवण्यात आले असून नागरिकांना घरात राहण्याचा आणि बाल्कनीपासून दूर राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
  • भारत-पाक संघर्षाचा शेअर बाजाराला दणका ! सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये; रिलायन्स, टाटा स्टॉक्सही घसरले
  • भारताशी पंगा घेणं अंगलट; पाकिस्ताननं असीम मुनीरलाच उचललं; लष्कर प्रमुखपदावरुन हटवलं? देशद्रोहाचा गुन्हाही दाखल ...
  • मुंबईच्या साकीनाका परिसरात संशयास्पद ड्रोनच्या घिरट्या, पोलीस सतर्क; कोम्बिंग ऑपरेशनला सुरुवात..
  • मोठी बातमी!! अखेर IPL स्पर्धा स्थगित; BCCI चा मोठा निर्णय
  • परराष्ट्र मंत्रालय पत्रकार परिषदेतेतील ठळक मुद्दे पाकीस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द ४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडून जाण्याचे आदेश भारताने सिंधू पाणी करारास स्थगिती अटारी वाघा बॅार्डर १ मे पर्यंत बंद
 DIGITAL PUNE NEWS

ज्ञानी जनांची नि:संदेह स्थिती (भाग २)

डिजिटल पुणे    14-04-2025 10:38:03

ज्ञानी जनांची नि:संदेह स्थिती (भाग २)
 
मागील लेखापासून पुढे
 
जो त्या आत्म तत्वाला शोधायला जातो तो तेच होऊन जातो. असा योगी बाहेरुन सामान्य माणसासारखा देहधारी दिसत असला तरी त्याला देहात, पंचमहाभूतात बघायला जावे तर तेथे तो नसतो. आपण त्याला शोधायला जावे तर आपली स्थितीही तशीच होऊन जाते. असे साधू शुद्ध परमात्म स्वरुप असतात. मायेचा मल नाहीसा होऊन कसल्याही संकल्पाचा त्याला स्पर्श होत नाही. तो साक्षात वेदाचे स्वरूप झालेला असतो.
 
ऐसा जो का योगीराज | तो आत्मा सहजी सहज | पूर्णब्रह्म वेदबीज | देहाकारे कळेना ||९/३/२३||
 
अविद्येने जीवपणा येतो, जन्म मरण भोगावे लागते. ज्ञानी पुरुषाची परमात्म स्वरूप झाल्याने जन्म मरण उरत नाही. तो निर्गुण होतो. मग अज्ञानी माणसाने अशा ज्ञानी पुरुषाला म्हणजे निर्गुणाला जन्म मृत्यू आहे अशी कल्पना केली तरी असे कोणाच्या म्हणण्याने जन्म मरण येत नाही. माध्यान्ही सूर्यावर कोणी थुंकायला गेले तर थुंकी त्याच्याच तोंडावर पडेल. कर्तृत्ववन पुरुषावर कुत्री भुंकतात, त्यांच्याकडे कोण लक्ष देईल ? हीन लोकांकडे दुर्लक्ष केलेलं बरे ! ज्ञानी पुरुषाला सामान्य समजले तर आत्मज्ञान खचितच मिळणार नाही. जसा भाव तसा देव ! तसे फल !
 
सामान्य लोक पाषाणात देव शोधतात. पाषाण कधीतरी फुटेल पण निर्गुण, निराकार देव कधीच फुटत नाही. सामान्य लोक त्याला अनेकपणाने भजतात पण तो मात्र सगळीकडे गच्च भरून आहे. तो एकच एक आहे. अग्नी लाकडाला जाळतो तेव्हा त्याला लाकडाच्या आकाराचे रूप दिसते पण अग्नी कधी लाकूड होत नाही तसे ब्रह्मज्ञानी देहात राहतो पण त्याचे ज्ञान कधी देहरूप होत नाही. म्हणून साधूच्या दिसण्यावरून त्याच्या अवस्थेची कल्पना करता येत नाही.
 
कापूर जळताना दिसतो पण पुन्हा तो कर्दळीच्या पोटात उत्पन्न होत नाही, बी भाजले की ते रुजत नाही, वस्त्र जळाले की उकलत नाही, ओढा गंगेला मिळाला की निराळा काढता येत नाही तसे आत्मज्ञानी पुरुषाचा देह जरी दिसला तरी एकदा का तो पतन पावला की ज्ञानी पुरुषाला परत जन्म येत नाही. गंगेला मिळायच्या आधी ओढा म्हणून त्यास स्थलकालाच्या मर्यादा असतात म्हणून गंगेला मिळायच्या आधी ओढा वेगळेपणाने दिसतो. आत्मा सर्वदेशी, सर्वव्यापी आहे, स्थलकालाच्या मर्यादा त्यास नाहीत. आत्मस्वरूपाशी तदाकार होण्याआधी साधू वेगळेपणाने असतो खरा पण एकदा का स्वरुपाकार झाला की काहीच शिल्लक राहत नाही. अज्ञान अवस्थेचा मागमूस त्याच्याठिकाणी राहत नाही. म्हणून गंगेचा दृष्टांत साधूचे वर्णन करण्यासाठी अपुरा पडतो.
 
सोने धातू श्रेष्ठ तर लोखंड कनिष्ठ असते. दोघांचे गुणधर्म निराळे असतात. तसे ज्ञानी पुरुष सोन्यासारखा व अज्ञानी लोखंडासारखा समजावा. आंधळ्या माणसाला स्वत:ला काही दिसत नाही म्हणून इतरांनाही आंधळेपणाने दिसत नाही असे म्हणता येत नाही. ज्वरात माणूस असंबद्ध बडबडतो तसे अज्ञानी माणूस साधू विषयी बडबडतो. स्वप्नात भयाने कोणी ओरडत उठतो पण जागे असणाऱ्या माणसाला ते भय नसते. सर्पाचा आकार असलेली मुळी दोघांनी पाहिली. एकाला भीती वाटली पण दुसऱ्याला ती मुळी म्हणून दिसली. या दोघांची स्थिती एकच कशी म्हणावी ? तसे मिथ्या देहाला अज्ञानी सत्य मानून जगतो आणि त्या दृश्याच्या भयाने ग्रस्त राहतो, जन्म मरण घेत राहतो पण आत्मबुद्धी प्राप्त झालेल्या साधूला दृश्य मिथ्या, स्वप्न आहे अशी खात्री झाल्याने निर्भयता येते. जन्म मरणाच्या चक्रातून तो सुटतो.
 
साप, विंचू चावलेल्या माणसाला विष बाधते पण बाकीचे काही कासावीस होत नाहीत. तसे अज्ञानी माणूस जन्म मरणाच्या भयाने कासावीस असतो. ज्ञानी पुरुषासाठी ते भय नसते. जो ज्ञानी आहे त्यालाच ज्ञानी पुरुषाची अवस्था कळू शकते.
 
श्रीराम कथाव्यास/प्रवचनकार : श्री. दामोदर रामदासी पुणे. (रामदासी मठ परंपरा, नवगणराजुरी, जिल्हा बीड)


 Give Feedback



 जाहिराती