सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ब्लॅकआऊटवेळी हॉस्पिटलसोबत समन्वय यंत्रणा उभी करा. टार्गेट होऊ नये म्हणून लाईट बंद केले जातात, त्यामुळे पर्यायी विद्युत व्यवस्थेद्वारे यंत्रणा सुरू ठेवून, गडद रंगाचे पडदे अथवा गडद रंगाच्या काचा वापरून त्याचवेळी बाहेरून लाईट दिसणार नाही, अशी व्यवस्था करा.
  • पोलिस विभागाने नेहमीपेक्षा जास्त जागरूकता ठेवावी. देशद्रोही व्यक्तींच्या कारवाया वाढण्याची शक्यता पाहता अधिक कोंबिग ऑपरेशन करा आणि गस्त अधिक चोख करा.
  • प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांच्या सायबर सेलने समाजमाध्यमांवर देखरेख ठेवत पाकिस्तानला मदत करणारे हॅण्डल ओळखून त्यावर कारवाई करा. शत्रूला मदत करणारी अथवा चुकीची माहिती कुणी प्रसारित करीत असेल तर त्यावर कारवाई करा.
  • ब्लॅकआऊट म्हणजे काय आणि अशावेळी काय करावे, यांचे व्हिडिओ विद्यार्थी, नागरिकांपर्यंत पोहोचवा. व्यापक जनजागृती करा.
  • राज्यातील महत्वाच्या पदांवर विशेषतः आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन इत्यादी विभागांतील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
  • भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला.
  • भारत-पाकिस्तानमध्ये तणाव! पुण्यात ‘श्रीमंत’ दगडूशेठ गणपती’ मंदिराच्या सुरक्षेत मोठी वाढ
  • मुंबई-पुण्यात हाय अलर्ट जारी! नौदलाकडून मच्छिमारांना महत्वाच्या सूचना
  • चंदीगढमध्ये हवाई दल स्थानकाजवळ सायरन वाजवण्यात आले असून नागरिकांना घरात राहण्याचा आणि बाल्कनीपासून दूर राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
  • भारत-पाक संघर्षाचा शेअर बाजाराला दणका ! सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये; रिलायन्स, टाटा स्टॉक्सही घसरले
  • भारताशी पंगा घेणं अंगलट; पाकिस्ताननं असीम मुनीरलाच उचललं; लष्कर प्रमुखपदावरुन हटवलं? देशद्रोहाचा गुन्हाही दाखल ...
  • मुंबईच्या साकीनाका परिसरात संशयास्पद ड्रोनच्या घिरट्या, पोलीस सतर्क; कोम्बिंग ऑपरेशनला सुरुवात..
  • मोठी बातमी!! अखेर IPL स्पर्धा स्थगित; BCCI चा मोठा निर्णय
  • परराष्ट्र मंत्रालय पत्रकार परिषदेतेतील ठळक मुद्दे पाकीस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द ४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडून जाण्याचे आदेश भारताने सिंधू पाणी करारास स्थगिती अटारी वाघा बॅार्डर १ मे पर्यंत बंद
 जिल्हा

नाशिकमध्ये अनधिकृत दर्गा तोडायला सुरुवात, पोलिसांवर दगडफेक, वाहनांची तोडफोड

डिजिटल पुणे    16-04-2025 10:50:54

नाशिक:   नाशिकच्या काठे गल्लीतील अनधिकृत दर्गा हटवण्यापूर्वीच काल (१५ एप्रिल) रात्री उशिरा या भागात जोरदार राडा झाला. दर्गा हटवण्याच्या कारवाईपूर्वीच दर्ग्याच्या परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पण अचानक त्या ठिकाणी मोठा जमाव आक्रमक झाला आणि पोलिसांवर दगडफेक केली. या दगडफेकीत २२ पोलिस जखमी झाले असून अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले. पण पोलिसांनी काही वेळातच परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या पोलिस बंदोबस्तात पहाटेपासून दर्गा हटवण्याचे काम सुरू आहे. काठे गल्ली परिसरात तणावाचे वातावरण असून, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

 नाशिकच्या काठे गल्ली परिसरात असलेला अनधिकृत दर्गा आज (16 एप्रिल)  हटवण्याची कारवाई होणार होती. मात्र, काल रात्रीच या कारवाईबाबत अफवा पसरल्यानंतर काही नागरिकांनी काठे गल्ली गाठली. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे जमाव आणखी आक्रमक झाला. दर्गा हटवण्यापूर्वीच अफवा पसरवण्यात आल्याने परिस्थिती चिघळली. घटनास्थळी आधीच ५०० पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र, त्याचवेळी ४०० पेक्षा अधिक लोकांचा जमाव त्या ठिकाणी एकत्र झाला. जमावाने आक्रमक होत पोलिसांवर दगडफेक केली. या हिंसाचारात अनेक पोलिस जखमी झाले आहेत.

नाशिकच्या काठे गल्ली परिसरात असलेल्या अनधिकृत दर्गा हटवण्याच्या कारवाईदरम्यान काल रात्री तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली. जमावाने केलेल्या दगडफेकीत दोन सहाय्यक पोलिस आयुक्त आणि २० हून अधिक पोलिस कर्मचारी जखमी झाले असून, एका पोलिस कर्मचाऱ्याच्या पायाला फ्रॅक्चर झालं आहे.

दगडफेक करणाऱ्या जमावातील काही जणांना पोलिसांनी अटक केली असून, सध्या आठपेक्षा अधिक लोक पोलिसांच्या ताब्यात आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस सातत्याने प्रयत्नशील आहेत. या घटनेनंतर काठे गल्ली परिसरातील वाहतूक मार्गात अनेक बदल करण्यात आले असून, नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दर्गा हटवण्यासाठी नोटीस देऊनही कारवाई टाळली गेली होती

नाशिक महानगरपालिकेने न्यायालयाच्या आदेशानुसार १ एप्रिल रोजी या अनधिकृत दर्ग्याला नोटीस बजावली होती. स्वतःहून हे बांधकाम हटवण्याची सूचना देण्यात आली होती, अन्यथा महापालिकेकडून तोडकाम करण्यात येईल असा इशारा दिला होता. मात्र, मुदत संपल्यानंतरही कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्यामुळे १५ एप्रिलपासून पालिकेकडून ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. मोठ्या पोलिस बंदोबस्तात ही कारवाई सुरू असून, दर्गा परिसराच्या १०० मीटर परिसरात बॅरिकेडिंग लावण्यात आले आहेत.  कोणालाही आत जाण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. दुपारपर्यंत अनधिकृत दर्गा पूर्णतः हटवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.


 Give Feedback



 जाहिराती