सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • परराष्ट्र मंत्रालय पत्रकार परिषदेतेतील ठळक मुद्दे पाकीस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द ४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडून जाण्याचे आदेश भारताने सिंधू पाणी करारास स्थगिती अटारी वाघा बॅार्डर १ मे पर्यंत बंद
 DIGITAL PUNE NEWS

सिंबायोसिस स्किल्स युनिव्हर्सिटी तर्फे अविनाश कार्गो प्रा. लि. च्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण व प्रमाणपत्र वितरण

डिजिटल पुणे    23-04-2025 17:28:39

पुणे -  "व्यवसाय, व्यापार हे सतत बदलत आहेत, ते चालवण्याची पद्धत देखील बदलत आहे, आणि या मुळेच कोणत्याही कंपनी मध्ये काम करत असताना नोकरदार व्यक्तींना नवीन येणाऱ्या तांत्रिक व औद्योगिक, प्रगत कौशल्य शिकत राहण्याची व  त्यात निपुण होण्याची गरज आहे . डिजिटल टेकनॉलॉजि, आर्टीफिसिअल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग या नवीन गोष्टी शिकणे अत्यंत गरजेचे आहे. सिंबायोसिस स्किल्स युनिव्हर्सिटी ही  विद्यार्थी तसेच नोकरदार व्यक्तींना, येणाऱ्या नवनवीन क्षेत्रांसाठी तयार करण्याचे काम जोमाने करत आहे. अविनाश कार्गो प्रा. लि. या कंपनीच्या व्यवस्थापकीय स्तरावरील एकूण २९ कर्मचाऱ्यांसाठी विविध विषयांवर प्रशिक्षण व प्रमाणपत्र देण्यात आले." अशी माहिती डॉ. स्वाती मुजुमदार, प्र-कुलपती, सिंबायोसिस स्किल्स ॲन्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी यांनी प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात दिली.

सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, स्कूल ऑफ पोर्ट्स, टर्मिनल मॅनेजमेंट अँड लॉजिस्टिक्सने अविनाश कार्गो प्रा. लि. (ACPL) या कंपनीच्या व्यवस्थापकीय स्तरावरील कर्मचाऱ्यांसाठी जानेवारी ते एप्रिल २०२५ दरम्यान ४ महिन्यांचा लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम यशस्वीरित्या आयोजित केला.

या प्रभावी प्रवासाची सांगता प्रमाणपत्र वितरण समारंभाने करण्यात आली. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या तुकडीत सिआरएम (CRM) टीम, सेल्स टीम, लॉजिस्टिक्स ऑपरेशन्स आणि एक्स्पोर्ट ऑपरेशन्स मॅनेजमेंटमधील टीम लीड्स आणि फ्रंटलाइन लीडर्स या विभागाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश होता, अविनाश कार्गोच्या दुसऱ्या विभागातील टीम मध्ये एकूण २९ सहभागींना  विविध विषयांवर प्रशिक्षण देण्यात आले.

"सिंबायोसिस स्किल्स युनिव्हर्सिटी तर्फे दिल्या जाणाऱ्या या प्रशिक्षणाचा आमच्या कर्मचाऱ्यांना खूप जास्त फायदा होतो, सध्या कंपनी मध्ये काम करत असणारे कर्मचारी हे अगदी साधारण शिक्षण घेतलेले असतात, प्रत्यक्षात काम करताना उच्च आणि आधुनिक प्रशिक्षणाची गरज वेळोवेळी जाणवते. काम करत  असताना योग्य निर्णय क्षमता, लीडरशिप स्किल्स, एकत्र समूहाने काम करण्याची पद्धत हे  या अशा प्रकारच्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिकता येते,या प्रशिक्षणा मुळे आमच्या कर्मचाऱ्यांना अद्ययावत राहणे सोपे जाते." -  अविनाश शेळके, संचालक, अविनाश कार्गो प्रा. लि

"व्यवसायाला उच्च शिक्षित कर्मचाऱ्यांची गारच आहे, शाळा, विद्यापीठे भारतात भरपूर आहेत, पण प्रत्यक्षात काम करण्यासाठी ज्या प्रशिक्षणाची गरज आहे ते विद्यार्थ्यंना मिळत नाही. प्रत्यक्ष कामाचा अनुभव हा फार कमी ठिकाणी मिळतो.  हीच कमतरता भरून काढण्यासाठी सिंबायोसिस स्किल्स युनिव्हर्सिटी मोठया  प्रमाणावर काम करत आहे. - राघवन संथानम, संचालक, स्कूल ऑफ पोर्ट्स, टर्मिनल मॅनेजमेंट अँड लॉजिस्टिक्स, एसएसपीयु

यापूर्वी, या कार्यक्रमाच्या पहिल्या तुकडीत अविनाश कार्गोच्या पहिल्या विभागातील लॉजिस्टिक्स ऑपरेशन्समध्ये कार्यरत ३० कंट्री मॅनेजर्सना लॉजिस्टिक्स क्षेत्रातील कौशल्य विकासासाठीच्या प्रमाणपत्र कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण देण्यात आले होते.


 Give Feedback



 जाहिराती