पुणे : दिनांक 19 व 20 एप्रिल पुनावळे येथे अधिरा इंटरनॅशनल स्कूल आयोजित इचीबाण शितो रियो पुणे जिल्हा आंतरशालेय कराटे स्पर्धा पुनावळे येथे आयोजन करण्यात आले,स्पर्धेचे उद्घाटन पदमश्री व अर्जुन पुरस्कार विजेते मा.श्री मुरलीकांत पेटकर व प्रमुख आयोजक अधिरा इंटरनॅशनल स्कूल चेअरमन पिं.चिं.भाजपा उपाध्यक्ष माननीय श्री नवनाथ ढवळे सर माननीय श्री अर्जुन पेटकर सर यांच्या उपस्थित मध्ये स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले,विशेष बक्षीस वितरण पॅराडाईज सोसायटीचे चेअरमन माननीय श्री.शिरसागर साहेब सोमानी रेसिडेन्सी चे चेअरमन माननीय श्री.किरण सावंत साहेब यांच्या शुभहस्ते वितरण समारंभ करण्यात आले.
या स्पर्धेत 500 हून अधिक खेळाडू सहभागी होते व पुण्यातील इंटरनॅशनल स्कूलच्या आणि इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी एकूण 40 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.काता आणि कुमिते या दोन प्रकारांमध्ये स्पर्धा घेण्यातआली,प्रथम पारितोषिकअधिरा इंटरनॅशनल स्कूल नी पटकावले तर द्वितीय पारितोषिक अल्लाड पब्लिक स्कूल तृतीय पारितोषिक कर्मवती इंग्लिश मीडियम स्कूल, चौथा पारितोषिक बाल सेवा इंग्लिश मीडियम स्कूल यांनी पटकावले,या स्पर्धेचं आयोजन- टेक्निकल डायरेक्टर इसको इंडिया प्रमुख प्रशिक्षक -शिहान अशोक वेताळ, इतर प्रशिक्षक मुकुंद मराठे ,अरुण पवार,शिवतेज सावंत,तेजप्रताप पासवान,विश्वजीत सावंत,शरद भोसले,विशाल पाडुळे,वैष्णव सावं,हेमंत कुमावत,रोहित कुमावत, पृथ्वीराज पवार साक्षी दराडे,सारिका वेताळ,धनश्री सावंत,दर्शन सावंत,संयम मोहिते,शंकर भारती या सर्वांनी स्पर्धेमध्ये पंच म्हणून काम पाहिले.