सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • परराष्ट्र मंत्रालय पत्रकार परिषदेतेतील ठळक मुद्दे पाकीस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द ४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडून जाण्याचे आदेश भारताने सिंधू पाणी करारास स्थगिती अटारी वाघा बॅार्डर १ मे पर्यंत बंद
 DIGITAL PUNE NEWS

घराला हातभार लावत केली UPSC ची तयारी;खडतर परिस्थितीवर मात करत पुजाऱ्याच्या मुलाची ३३६ वी रँक ,मिळवलं घवघवीत यश

डिजिटल पुणे    24-04-2025 18:06:02

नांदेड : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत लोहा तालुक्यातील गोलेगाव येथील डॉ.सुनील रामलिंग स्वामी यांनी देशात 336 वि रँक मिळवत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये अभ्यास पूर्ण करून अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले. वडील रामलिंग स्वामी हे पुजारी असून, आई घरकाम करते. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आपल्या मुलाला शिकविले. मुलानेही आपल्या आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून अथक परिश्रम घेऊन अत्यंत कठीण अशा यूपीएससी परीक्षेत यशाला गवसणी घातली.

आई-वडिलांनी सुनीलला पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण घेण्यासाठी त्याची मावशी आशाताई मठपती यांच्याकडे खेडकरवाडी येथे ठेवले. त्यानंतर पाचवी ते दहावीचे शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. दहावी बोर्डाच्या परीक्षेत इंग्रजी विषयात ४० मार्क मिळाले म्हणून निराश न होता तेथूनच अधिकारी होण्याचे ध्येय बाळगले. पुढे अकरावी, बारावीसाठी लोहा शहरातील श्री संत गाडगे महाराज विद्यालयात प्रवेश घेतला. बारावीनंतर बीएससी अॅग्रीसाठी लातूर येथे शिक्षणाला सुरुवात केली. सुनीलला शिक्षणासाठी दरमहा १५०० रुपये मिळायचे. त्यानंतर बहीण, भाऊ हे शिकायला असल्यामुळे सुनील स्वामी यांनी खासगी शिकवणीला सुरुवात केली. कुटुंबातील बहीण, भाऊ आई-वडिलांना पैसे पाठवायचे. यातूनच भाऊ वैभव स्वामी हा आयटी इंजिनिअर, तर बहीण सोनू स्वामी अॅग्रीकल्चर श्रेणी एक अधिकार म्हणून बंगळुरू येथे रुजू झाली.

सुनील स्वामी यांनी लातूर येथे खासगी शिकवणी घेत ऑल इंडिया आरसीआरमध्ये ११० रँक मिळून ते झांसी येथे अॅग्री सायंटिस्ट म्हणून कार्यरत होते. त्यानंतर यूपीएससी परीक्षेत देशात ३३६ वी रँक मिळविली. एका सामान्य कुटुंबातील मुलगा मोठा अधिकार होणार असल्याने आई-वडिलांसह गावकऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

लोहा तालुक्यातील रहिवासी असलेले सुनील रामलिंग स्वामी यांनी कठीण परिस्थितीचा सामना करत ३३६ रँक पटकावला आहे. त्यांचे वडील पुजारी आहेत. सुनील यांनी मावशीकडे राहून मोठ्या जिद्दीनं तयारी करत यश संपादन केलं आहे. अतिशय अवघड मानल्या जाणाऱ्या यूपीएससी परीक्षेत नांदेड जिल्ह्यातून सहा जणांनी देदिप्यमान यश संपादन केलं. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांना प्रेरणा मिळाली आहे. या सहा जणांनी यूपीएससी परीक्षेत यश प्राप्त केल्यानं त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

 


 Give Feedback



 जाहिराती