सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ब्लॅकआऊटवेळी हॉस्पिटलसोबत समन्वय यंत्रणा उभी करा. टार्गेट होऊ नये म्हणून लाईट बंद केले जातात, त्यामुळे पर्यायी विद्युत व्यवस्थेद्वारे यंत्रणा सुरू ठेवून, गडद रंगाचे पडदे अथवा गडद रंगाच्या काचा वापरून त्याचवेळी बाहेरून लाईट दिसणार नाही, अशी व्यवस्था करा.
  • पोलिस विभागाने नेहमीपेक्षा जास्त जागरूकता ठेवावी. देशद्रोही व्यक्तींच्या कारवाया वाढण्याची शक्यता पाहता अधिक कोंबिग ऑपरेशन करा आणि गस्त अधिक चोख करा.
  • प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांच्या सायबर सेलने समाजमाध्यमांवर देखरेख ठेवत पाकिस्तानला मदत करणारे हॅण्डल ओळखून त्यावर कारवाई करा. शत्रूला मदत करणारी अथवा चुकीची माहिती कुणी प्रसारित करीत असेल तर त्यावर कारवाई करा.
  • ब्लॅकआऊट म्हणजे काय आणि अशावेळी काय करावे, यांचे व्हिडिओ विद्यार्थी, नागरिकांपर्यंत पोहोचवा. व्यापक जनजागृती करा.
  • राज्यातील महत्वाच्या पदांवर विशेषतः आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन इत्यादी विभागांतील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
  • भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला.
  • भारत-पाकिस्तानमध्ये तणाव! पुण्यात ‘श्रीमंत’ दगडूशेठ गणपती’ मंदिराच्या सुरक्षेत मोठी वाढ
  • मुंबई-पुण्यात हाय अलर्ट जारी! नौदलाकडून मच्छिमारांना महत्वाच्या सूचना
  • चंदीगढमध्ये हवाई दल स्थानकाजवळ सायरन वाजवण्यात आले असून नागरिकांना घरात राहण्याचा आणि बाल्कनीपासून दूर राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
  • भारत-पाक संघर्षाचा शेअर बाजाराला दणका ! सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये; रिलायन्स, टाटा स्टॉक्सही घसरले
  • भारताशी पंगा घेणं अंगलट; पाकिस्ताननं असीम मुनीरलाच उचललं; लष्कर प्रमुखपदावरुन हटवलं? देशद्रोहाचा गुन्हाही दाखल ...
  • मुंबईच्या साकीनाका परिसरात संशयास्पद ड्रोनच्या घिरट्या, पोलीस सतर्क; कोम्बिंग ऑपरेशनला सुरुवात..
  • मोठी बातमी!! अखेर IPL स्पर्धा स्थगित; BCCI चा मोठा निर्णय
  • परराष्ट्र मंत्रालय पत्रकार परिषदेतेतील ठळक मुद्दे पाकीस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द ४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडून जाण्याचे आदेश भारताने सिंधू पाणी करारास स्थगिती अटारी वाघा बॅार्डर १ मे पर्यंत बंद
 शहर

बाबुरावजी घोलप महाविद्यालयामध्ये प्लास्टिक संकलन अभियान

डिजिटल पुणे    28-04-2025 11:15:46

पुणे : सांगवी येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे बाबुरावजी घोलप महाविद्यालयामध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या भारतामध्ये कार्यरत युनिसेफ अंतर्गत पर्यावरण संवर्धन व जनजागृतीसाठी स्थापन ग्रीन क्लबच्या वतीने आयोजित प्लास्टिक संकलन अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्या व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संगीता जगताप, उपप्राचार्य डॉ. वंदना पिंपळे, महाविद्यालय विकास समिती सदस्य डॉ. चंदा हासे, प्रा. विजय घारे, डॉ. अर्जुन डोके, युनिसेफच्या ग्रीन क्लब व प्लास्टिक संकलन अभियान समन्वयक डॉ. राणी भगत, वरिष्ठ लिपिक अनुरिता गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संगीता जगताप यांनी पर्यावरण संवर्धनासाठी आयोजित या अभियानामध्ये सहभागी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक करत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. अजितदादा पवार साहेब यांच्या पर्यावरण विषयक विचार व कार्यातून आदर्श घेत महाविद्यालय पर्यावरण संवर्धनासाठी नेहमी कटीबद्ध असल्याचे नमूद केले.सदर प्लास्टिक संकलन अभियानामध्ये महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी घरांमधील दुधाच्या पिशव्या, प्लास्टिक बॅाटल्स, प्लास्टिक आवरण व इतर प्लास्टिक टाकाऊ पदार्थ असा एकूण 56 किलो प्लास्टिक जमा करुन पुढील प्रक्रियेसाठी तो सागरमित्र आभियान, पुणे या पर्यावरणवादी स्वंयसेवी संस्थेकडे जमा करण्यात आला.

याकरिता कमिन्स ग्रुप, इंडिया यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.पर्यावरण संवर्धनासाठी हा नाविन्यपूर्ण उपक्रम यशस्वीपणे राबवत असल्याबद्दल पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष मा. राजेंद्रजी घाडगे, मानद सचिव ॲड. संदीप कदम, खजिनदार ॲड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम.पवार, सहसचिव ए.एम.जाधव यांनी बाबुरावजी घोलप महाविद्यालयाचे विशेष अभिनंदन केले आहे.या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. विजय घाडगे, डॉ. विद्या पाठारे, प्रा. नीलम खोमणे, प्रा. तनुजा तारु, डॉ. गीतांजली शेलार, डॉ. मनीषा शिंदे, प्रा. वनीता शिंदे, रवी लाड, प्रणित पावले, राजेश लांडगे यांनी परिश्रम घेतले.


 Give Feedback



 जाहिराती