छत्रपती संभाजीनगर: जम्मू कश्मीरमध्ये झालेल्या दहशवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला FATF (फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स) च्या ग्रे लिस्टमध्ये टाकावे, तरच त्यांना समजेल.”अशी मागणी एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ISISI असो वा पाकिस्तानातील इतर दहशतवादी संघटना भारतात हिंदू – मुस्लिम वाद व्हावेत, काश्मीरमध्ये नॉन मुस्लिम येऊ शकत नाही, हे त्यांना दाखवायचे होते. पण जे लोक जात धर्म विचारून मारहाण करतात, त्याची आम्ही निंदा करतो, असही ओवेसी यांनी म्हटल आहे.
असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, त्या काश्मिरी आदिलने हिंदू- मुस्लिम पहिलं नाही, जर कोणी हिंदू मुस्लिम करीत असेल तर ते चुकीच आहे. त्याची निंदा करतो. युद्ध करायचे की नाही, हे सरकारवर सोडा. सरकार काय करणार हे सरकार ठरवणार आहे. विरोधी पक्ष म्हणून आम्ही सरकारला सांगितले आहे. तुम्हाला काय करायचं करा, पण हा दहशतवाद कायमच संपवा. सरकारला त्यांचे काम करू द्या.
पाकिस्तानी नेते बिलावल भुट्टो यांच्या वक्तव्यांबाबत बोलताना ओवेसी म्हणाले की, बिलावल भुट्टो आताच राजनीतीमधे आले आहेत. दहशतवाद्यांनी त्यांच्या आईची गोळ्या घालून हत्या केली. ही गोष्ट त्यांना समजण्याची आवश्यकता आहे. बिलावल यांच्या आईला मारणारे दहशतवादी आणि आमच्या देशातील निष्पापानां मारणारे चांगले का?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
असदुद्दीन ओवैसी म्हणाले, वैष्णोदेवीजवळ एक असे ठिकाण आहे जिथे गेल्या वर्षी जुलैमध्ये ६० पर्यटकांचा मृत्यू झाला होता. म्हणून, प्रतिबंधात्मक धोरणाचा विचार करणे आवश्यक आहे. सर्वपक्षीय बैठकीत संपूर्ण विरोधी पक्षाने सरकारला सांगितले की, तुम्ही कारवाई करा, तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा, आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ जेणेकरून मृतांच्या कुटुंबियांना न्याय मिळेल आणि अशी घटना पुन्हा घडू नये. म्हणूनच आम्ही सरकारला पूर्ण पाठिंबा देत आहोत.
ते पुढे म्हणाले की, पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी पाकिस्तानात आहेत. त्यांना तिथून पूर्ण पाठिंबा मिळाला आणि त्यानंतर दहशतवाद्यांनी सीमा ओलांडली आणि पहलगाममध्ये येऊन दहशतवादी हल्ला केला. यापूर्वी, जेव्हा २६/११ चा मुंबईवर हल्ला झाला तेव्हा पाकिस्तानने आपला सहभाग नाकारला होता पण जेव्हा कसाब पकडला गेला तेव्हा त्यांना ते मान्य करावे लागले. पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकार कोणती भूमिका घेते हे त्यांच्यावर अवलंबून आहे. दहशतवाद्यांना रोखण्याची आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची गरज आहे असे आम्हाला वाटते.