बार्शी : बार्शी टेबल टेनिस अकादमीच्या विद्यार्थ्यांनी रायगड जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या वतीने आयोजित वेस्टर्न महाराष्ट्र आणि कोकण विभागीय टेबल टेनिस स्पर्धेत शानदार कामगिरी करून आपली चमकदार छाप सोडली.
ही स्पर्धा २६ व २७ एप्रिल २०२५ रोजी नवी मुंबई स्पोर्ट्स अँड समाज विकास मंडळ, पनवेल येथे पार पडली, ज्यामध्ये कोकण पश्चिम विभागातील विविध जिल्ह्यांतील सुमारे १५५ खेळाडूंनी सहभाग घेतला.या स्पर्धेत प्रथमच सहभागी होत असताना बार्शी टेबल टेनिस अकादमीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रदर्शन करत अनेक पदकांची कमाई केली:
अंडर ११ मुलगे विजेता : राजवर्धन तिवारी
अंडर ११ मुली विजेती : शिवानी सानप
अंडर १३ मुलगे उपविजेता : राजवर्धन तिवारी
अंडर १५ मुलगे उपविजेता : वेदांत खळदे
अंडर १७ मुलगे कांस्यपदक विजेता : ओंकार मुळे
अंडर १७ मुलगे उपांत्य फेरी गाठलेले : अथांग ऐनापूरे
या सर्व गुणवंत खेळाडूंना बार्शी टेबल टेनिस अकादमीचे प्रशिक्षक गणेश स्वामी यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण दिले जात आहे.या यशस्वी खेळाडूंचा महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेचे सरचिटणीस मा. यतीन टिपणीस सर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला, जो संपूर्ण बार्शी टेबल टेनिस अकादमीसाठी अभिमानाचा क्षण ठरला.
प्रशिक्षक गणेश स्वामी यांनी वेस्टर्न महाराष्ट्र आणि कोकण विभागीय टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष व कोषाध्यक्ष मा. संजय कडू सर यांचे मनःपूर्वक आभार मानले की, त्यांनी त्यांच्या खेळाडूंना अशी अमूल्य संधी दिली.या दिमाखदार पदार्पणासह बार्शी टेबल टेनिस अकादमी प्रादेशिक टेबल टेनिस क्षेत्रात उदयोन्मुख शक्ती म्हणून उदयास येत आहे आणि नवोदित खेळाडूंना उत्तम यशासाठी प्रेरित करत आहे.