इस्लामाबाद – भारताशी वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या लष्करामध्ये मोठा असंतोष उसळला आहे. गेल्या ४८ तासांत तब्बल २५० अधिकाऱ्यांनी आणि १२०० हून अधिक सैनिकांनी राजीनामे दिले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. लेफ्टनंट जनरल ओमर अहमद बोखारी (कमांडर, XI कॉर्प्स, पेशावर) यांनी २६ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ८ वाजता पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांना पाठवलेल्या एका अधिकृत पत्रातून ही गंभीर बाब उघड झाली आहे.
या पत्रामध्ये त्यांनी या राजीनाम्यांना कारणीभूत ठरलेल्या मानसिक थकव्याची, कौटुंबिक दबावाची आणि भारताशी सुरू असलेल्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्करी धोरणातील अनिश्चिततेची स्पष्ट नोंद केली आहे.
राजीनाम्यांचे तपशील (२६ एप्रिल २०२५):
1. XII Corps (Quetta):
• १२० अधिकारी आणि ४०० सैनिक
• प्रभावित युनिट: पश्चिम सीमेवर कार्यरत इन्फंट्री रेजिमेंट
2. Force Command Northern Areas (FCNA):
• ८० अधिकारी आणि ३०० सैनिक
• प्रभावित युनिट: उत्तरेकडील पर्वतीय सुरक्षा युनिट
3. I Corps (Mangla):
• ५० अधिकारी आणि ५०० सैनिक
• प्रभावित युनिट: अग्रभागी तैनात यांत्रिक इन्फंट्री आणि तोफखाना तुकड्या
एकूण राजीनामे: २५० अधिकारी + १२०० सैनिक = १५०० पेक्षा अधिक
पत्रात लेफ्टनंट जनरल बोखारी यांनी लिहिले आहे की, “या लाटेमुळे सैन्यातील कार्यक्षमतेवर आणि मनोबलावर मोठा परिणाम झाला आहे. ही परिस्थिती अतिशय चिंताजनक असून, तातडीने हस्तक्षेप करणे अत्यावश्यक आहे.”त्यांनी पुढे म्हटले आहे की, “राजीनामे देणाऱ्यांमध्ये मानसिक थकवा, कुटुंबीयांचा दबाव, आणि भारताशी संभाव्य संघर्षाच्या पार्श्वभूमीवर धोरणात्मक दिशांबाबत अनिश्चितता ही प्रमुख कारणं आहेत.”


भारताची कडक भूमिका
भारताने पाकिस्तानशी तणाव वाढल्यानंतर आपले हवाई क्षेत्र बंद केले असून, इंदस जल करारातील सहकार्यही तात्पुरते स्थगित केले आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या अंतर्गत लष्करी हालचालींवर त्याचा दडपणाचा परिणाम होत असल्याचे मानले जात आहे.
ही राजीनाम्यांची लाट पाकिस्तानच्या लष्करी यंत्रणेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. जर ही स्थिती लवकर नियंत्रित झाली नाही, तर लष्कराची युद्धसज्जता आणि अंतर्गत सुरक्षेवर मोठा परिणाम होऊ शकतो. भारताशी असलेले तणावपूर्ण संबंध या घटनांमुळे आणखी चिघळण्याची शक्यता आहे.