सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • परराष्ट्र मंत्रालय पत्रकार परिषदेतेतील ठळक मुद्दे पाकीस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द ४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडून जाण्याचे आदेश भारताने सिंधू पाणी करारास स्थगिती अटारी वाघा बॅार्डर १ मे पर्यंत बंद
 विश्लेषण

केदारनाथमध्ये बम बम भोलेचा गजर! केदारनाथ मंदिराचे दरवाजे भक्तांसाठी खुले; चारधाम यात्रेला जल्लोषात सुरुवात

डिजिटल पुणे    02-05-2025 12:59:29

उत्तराखंड : रुद्रप्रयागमध्ये स्थित केदारनाथ धामचे दरवाजे भाविकांना दर्शनासाठी उघडण्यात आले आहेत. त्यामुळं चारधामची यात्रा आता सुरू झाली आहे. देशभरातून लाखो भाविक केदारनाथांचं दर्शन घेण्यासाठी उत्तराखंडला येत असतात. बाबा केदारनाथाचे दरवाजे हे सहा महिने दर्शनासाठी बंद असतात. त्यानंतरचे सहा महिले हे दरवाजे पुन्हा एकदा भाविकांसाठी खुले केले जातात.बारा ज्योतिर्लिंगांपैकी अकरावे ज्योतिर्लिंग असलेल्या केदारनाथ धामचे दरवाजे आज (2 मे) उघडण्यात आले आहेत. केदारनाथ यात्रेला आजपासून सुरूवात झाली असून त्यासाठी देशभरातले भक्तगण दाखल झाले आहेत. यावेळी संपूर्ण केदारपुरी ‘बम-बम भोले’, ‘जय बाबा केदार’च्या जयघोषानं दुमदुमली होती. त्यामुळं परिसरातील वातावरण भक्तिमय झालंय.

आज सकाळी ७ वाजता बाबा केदारचे दरवाजे भक्तांसाठी पूर्ण विधीपूर्वक उघडण्यात आले. दरवाजे उघडण्याच्या निमित्तानं केदारनाथ धाममध्ये 15 हजारांहून अधिक भाविक उपस्थित होते. केदारनाथ धामचे दरवाजे उघडण्याच्या प्रसंगी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामीही उपस्थित होते. गुरुवारी सायंकाळी बाबा केदार यांची पंचमुखी चल विग्रह उत्सव डोली केदारनाथ धाममध्ये पोहोचली होती. केदारनाथ धाममध्ये पोहोचल्यानंतर बाबांची पालखी भांडारात ठेवण्यात आली.

 यावेळी केदारनाथ मंदिराला 108 क्विंटल फुलांनी सजवण्यात आलं होतं. उखीमठ येथील ओंकारेश्वर मंदिरातून बाबांची पालखी केदारनाथकडं रवाना झाली असताना हजारो भाविकही पालखीसोबत चालत केदारनाथला पोहोचले. आज सकाळी हेलिकॉप्टरद्वारे केदारनाथ मंदिरावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. तसंच भारतीय सैन्य दलाच्या बँड पथकानंही यावेळी वादन केलं.

यमुनोत्री आणि गंगोत्री धामांचे दरवाजे ३० एप्रिल रोजी उघडले आहेत. आता बद्रीनाथ धामचे दरवाजे ४ मे रोजी उघडणार आहेत. बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडतील, तेव्हा चारधाम यात्रा पूर्णपणे सुरू होईल. उत्तराखंडची ही चारधाम यात्रा पुढील ६ महिने सुरू राहणार आहे. ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये चारधाम यात्रा पूर्ण होते. त्यानंतर ६ महिने या धामांचे दरवाजे बंद राहतात.

आज (दि.02) केदारनाथ धामचे दरवाजे उघडले आहेत. सकाळी सात वाजता केदारनाथ धाम मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. हिवाळ्यामध्ये केदारनाथमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बर्फवृष्टी होत असते. यामुळे मंदिर परिसरामध्ये बर्फाचा अक्षरशः खच पडलेला असतो. यामुळे केदारनाथ धाम हे सहा महिन्यांसाठी बंद असते. यानंतर मंदिर सुरु होते. भाविकांसाठी आता मंदिरे खुले करण्यात आले आहे. त्यापूर्वी मंदिराला फुलांची आकर्षक सजावट आणि आरास करण्यात आली. याचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

हर हर महादेव जयघोषात केदारनाथ दुमदुमले

बाबा केदारनाथ यांचा पंचमुख चलविग्रह उत्सव पालखी सोहळा देखील पार पडला आहे. गुरुवारी (दि.01) दुपारी ही पालखी भगवान केदारनाथाच्या जयघोषामध्ये केदारनाथमध्ये दाखल झाली होती. भोलेनाथांच्या दर्शनासाठी १५ हजार भाविक केदारनाथमध्ये दाखल झाले होते. यासाठी गुरुवारी मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. ‘हर हर महादेव, बम बम भोले’च्या जयघोषात केदारथाम दुमदुमून गेलं. यानिमित्त केदारनाथ मंदिर 108 क्विटल फुलांनी सजवण्यात आले आहे.

केदारनाथचे दरवाजे उघडल्यानंतर, भाविकांना 6 महिने दर्शन घेता येणार आहे. चार धाम म्हणजे बद्रीनाथ, द्वारका, पुरी आणि रामेश्वरम यांसारखी चार पवित्र स्थळे. या स्थळांची यात्रा करणे हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.केदारनाथमध्ये हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होते. मंदिर आणि आसपासचा परिसरात बर्फ साठलेला असतो. त्यामुळं हिवाळ्याचे काही महिने ही यात्रा बंद असते. दरम्यान, अक्षय्य तृतीयेनंतर दोन दिवसांनी मंदिराचे दरवाजे उघडण्याचे आले असून नोव्हेंबरपर्यंत हे मंदिर भाविकांसाठी खुलं असणार आहे. केदारनाथमधील बाबा भोलेनाथांच्या दर्शनापासून ही यात्रा सुरु होते. दरम्यान, मोठ्या संख्येने भाविक या चारधाम यात्रेसाठी केदारनाथमध्ये दाखल झाले आहेत. 


 Give Feedback



 जाहिराती