राधानगरी : राधानगरी तालुक्यातील वक्रतुंड कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रेरणेतून 'कमवा आणि शिका' ही योजना मुलींसाठी देखील अंमलात आणण्यासाठी एज्युकेशन सोसायटीच्या जेनेसिस ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मध्ये प्रायोगिक तत्त्वावर उपक्रम सुरू केला आहे. त्यासाठी स्वतंत्र कक्ष देखील उभारण्यात आला असून; याचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रंसंगी ते म्हणाले, मुलींच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला. याचा राज्यभरातील मुलींना मोठा फायदा होत आहे. मात्र, आर्थिक दुर्बल मुलींना इतर खर्चासाठी कुटुंबावर अवलंबून रहावे लागते. यावर उपाय म्हणून संस्थेने सुरू केलेल्या या उपक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, याचा आनंद वाटला. भविष्यात हा उपक्रम राज्यभरात राबविण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वस्त केले. यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.