पुणे : भारतीय जनता पार्टीच्या संघटन पर्व अंतर्गत पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघात २६ मंडलांची रचना करुन यासाठी सर्वमंडलांच्या अध्यक्षांचीही निवड करण्यात आली आहे. यात मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते सर्व मंडल अध्यक्षांचा अभिनंदनपर सत्कार करत पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
मोहोळ म्हणाले, खरं तर भारतीय जनता पार्टी ही केवळ पार्टीच नाही, तर परिवार आहे. या परिवारात ज्याला जे दायित्व संघटनेकडून मिळते, ते तो अतिशय समर्पित भावनेतून आणि पूर्ण क्षमतेने झोकून देऊन पार पाडतो. सर्वसामान्य कार्यकर्ता आणि फिल्डवर असणारे पदाधिकारी हाच पार्टीचा आत्मा असून मंडल अध्यक्ष हा त्यापैकी महत्त्वाचा घटक ! दिलेली जबाबदारी ही केवळ जबाबदारीच नाही तर कर्तव्य आहे, या भूमिकेतून हे सर्व कार्यरत असतात. मीही या सर्व प्रक्रियेतून गेलो असल्याने मलाही या विविध भूमिकांचा प्रवास अनुभवता आला.
यावेळी श्री. संदीप मोझे, श्री. नितीन जाधव, श्री. आशिष देशमुख, श्री. रमेश गव्हाणे, श्री. शैलेंद्र बडदे, श्री. आनंद छाजेड, श्री. श्याम काची, श्री. लहु बालवडकर, श्री. नीलेश कोंढाळकर, श्री. कुलदीप सावळेकर, श्री. राजू कदम, श्री. निखिल शिळीमकर, श्री. प्रशांत थोपटे, श्री. सुशांत निगडे, श्री. विशाल कोंडे, श्री. अमित कंक, श्री. छगन बुलाखे, श्री. प्रशांत सुर्वे, श्री. महेश भोसले, श्री. गणेश वरपे, श्री. यशवंत लायगुडे, श्री. रुपेश घुले, श्री. प्रमोद टिळेकर, श्री. अमर गव्हाणे, श्री.संदीप लोणकर, श्री. आकाश डांगमाळी या मंडलाध्यक्षांचा सन्मान करण्यात आला.