सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • परराष्ट्र मंत्रालय पत्रकार परिषदेतेतील ठळक मुद्दे पाकीस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द ४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडून जाण्याचे आदेश भारताने सिंधू पाणी करारास स्थगिती अटारी वाघा बॅार्डर १ मे पर्यंत बंद
 DIGITAL PUNE NEWS

पुण्यात पुन्हा 'हिट अँड रन'! नवले पूलाजवळ भीषण अपघात; मर्सिडीज कारची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू, दोन आरोपी ताब्यात!

डिजिटल पुणे    03-05-2025 14:59:51

पुणे : पुण्यात पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना घडली आहे. नवले ब्रिज जवळ एका मर्सिडीज  कारने दुचाकीस्वाराला उडवले.नवले ब्रिज जवळ एका भरधाव मर्सिडीज कारने दुचाकीस्वाराला उडवल्याची माहिती आहे. या घटनेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. कुणाल हुशार (रा. चिंचवड) असं मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे सुमारे चार वाजता ही घटना घडली.  मर्सिडीज कार वेग अधिक होता. कारची थेट दुचाकीला धडक बसल्याने  एकाचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी कार चालकाला अटक झाली असून चालकाची मेडिकल झाली आहे. कायदेशीर सर्व प्रक्रिया पार पडली जात आहे. अशी माहिती उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली आहे. तसेच, या अपघातीप्रकरणी कोणतीही चुकीची माहिती पसरवली जाऊ नये असे आवाहनही उपायुक्त संभाजी कदम केलं आहे. 

घटनास्थळावरील नागरिकांचा दावा आहे की, मर्सिडीज चालवणारे आरोपी मद्यधुंद अवस्थेत होते. पोलिसांनी या दाव्याची नोंद घेतली असून, चालकाची मेडिकल झाली आहे. पुण्यातील नवले ब्रीजवर वारंवार अपघाताच्या घटना समोर येतात, अशातच नवले ब्रिजवर मर्सिडीज कारने दुचाकीस्वराला उडवलं. या घटनेने पुणे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.अपघातात एका जणांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. दोन कारचालकांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुण्यातील सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 Give Feedback



 जाहिराती