मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. बोर्डाकडून सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन निकालाबाबतची माहिती देण्यात येणार आहे. आज दुपारी एक वाजता विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाइन पाहाता येणार आहे.निकाल mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल तपासता येणार आहे.गुणपडताळणीसाठी 20 मेपर्यंत अर्ज करता येणार
आपल्या उज्ज्वल भविष्याचा निर्णय घेण्यासाठी ज्या निकालाची उत्सुकता असते अशा बारावीच्या परीक्षेचा निकाल अवघ्या काही तासांत जाहीर होणार आहे. राज्यातील १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा आहे. ११ फेब्रुवारी ते ११ मार्चदरम्यान विद्यार्थांनी परीक्षा दिली होती. विद्यार्थ्यांनी केलेल्या मेहनतीचं फळ त्यांना आज निकालाच्या स्वरूपात मिळणार आहे. दरवर्षी मुली बारावीत अव्वलस्थान पटकावतात. यंदा मुली हा रेकॉर्ड कायम ठेवणार की मुलं पहिल्या क्रमांकावर आपला ठसा उमटवणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. दुपारी १ वाजता अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येईल. विद्यार्थ्यांना विषयनिहाय मिळालेल्या गुणांचा तपशील उपलब्ध होईल तर उद्यापासून महाविद्यालयांमध्ये गुणपत्रिका मिळतील.
परीक्षेसाठी सुमारे ८.१ लाख विद्यार्थी, ६.९ लाख विद्यार्थिनी आणि ३७ ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा घेण्यात आली होती.
बारावीचा निकाल संकेतस्थळावर कसा तपासायचा?
- सर्वप्रथम महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in वर जा.
- होमपेजवरील HSC च्या लिंकवर क्लिक करा.
- तुमचा परिक्षा क्रमांक आणि इतर आवश्यक तपशील टाका आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
- तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल. सेव्ह करा आणि प्रिंट करा
बारावीचा निकाल कोणत्या संकेतस्थळावर पाहाल?
परीक्षेचा निकाल मंडळाच्या अधिकृत वेबसाइट mahahsscboard.in वर प्रसिद्ध केला जाईल. याशिवाय, विद्यार्थी इतर अधिकृत पोर्टलवर देखील त्यांचे निकाल तपासू शकतील.
https://results.digilocker.gov.in
https://mahahsscboard.in
http://hscresult.mkcl.org
https://results.targetpublications.org
https://results.navneet.com