सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ब्लॅकआऊटवेळी हॉस्पिटलसोबत समन्वय यंत्रणा उभी करा. टार्गेट होऊ नये म्हणून लाईट बंद केले जातात, त्यामुळे पर्यायी विद्युत व्यवस्थेद्वारे यंत्रणा सुरू ठेवून, गडद रंगाचे पडदे अथवा गडद रंगाच्या काचा वापरून त्याचवेळी बाहेरून लाईट दिसणार नाही, अशी व्यवस्था करा.
  • पोलिस विभागाने नेहमीपेक्षा जास्त जागरूकता ठेवावी. देशद्रोही व्यक्तींच्या कारवाया वाढण्याची शक्यता पाहता अधिक कोंबिग ऑपरेशन करा आणि गस्त अधिक चोख करा.
  • प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांच्या सायबर सेलने समाजमाध्यमांवर देखरेख ठेवत पाकिस्तानला मदत करणारे हॅण्डल ओळखून त्यावर कारवाई करा. शत्रूला मदत करणारी अथवा चुकीची माहिती कुणी प्रसारित करीत असेल तर त्यावर कारवाई करा.
  • ब्लॅकआऊट म्हणजे काय आणि अशावेळी काय करावे, यांचे व्हिडिओ विद्यार्थी, नागरिकांपर्यंत पोहोचवा. व्यापक जनजागृती करा.
  • राज्यातील महत्वाच्या पदांवर विशेषतः आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन इत्यादी विभागांतील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
  • भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला.
  • भारत-पाकिस्तानमध्ये तणाव! पुण्यात ‘श्रीमंत’ दगडूशेठ गणपती’ मंदिराच्या सुरक्षेत मोठी वाढ
  • मुंबई-पुण्यात हाय अलर्ट जारी! नौदलाकडून मच्छिमारांना महत्वाच्या सूचना
  • चंदीगढमध्ये हवाई दल स्थानकाजवळ सायरन वाजवण्यात आले असून नागरिकांना घरात राहण्याचा आणि बाल्कनीपासून दूर राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
  • भारत-पाक संघर्षाचा शेअर बाजाराला दणका ! सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये; रिलायन्स, टाटा स्टॉक्सही घसरले
  • भारताशी पंगा घेणं अंगलट; पाकिस्ताननं असीम मुनीरलाच उचललं; लष्कर प्रमुखपदावरुन हटवलं? देशद्रोहाचा गुन्हाही दाखल ...
  • मुंबईच्या साकीनाका परिसरात संशयास्पद ड्रोनच्या घिरट्या, पोलीस सतर्क; कोम्बिंग ऑपरेशनला सुरुवात..
  • मोठी बातमी!! अखेर IPL स्पर्धा स्थगित; BCCI चा मोठा निर्णय
  • परराष्ट्र मंत्रालय पत्रकार परिषदेतेतील ठळक मुद्दे पाकीस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द ४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडून जाण्याचे आदेश भारताने सिंधू पाणी करारास स्थगिती अटारी वाघा बॅार्डर १ मे पर्यंत बंद
 DIGITAL PUNE NEWS

धक्कादायक! मुळशी येथील मंदिरातील अन्नपूर्णा देवीच्या मुर्तीची विटंबना; पितापुत्राविरोधात गुन्हा दाखल

डिजिटल पुणे    05-05-2025 16:03:19

पुणे : देशभरात आधीच हिंदू- मुस्लिम वातावरण तापलेले असताना पुण्याजवळील मुळशीतून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुळशी तालुक्यातील पौड येथील नागेश्वर मंदिरात अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची विटंबना झाल्याची घटना समोर आली असून, यामुळे गावात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे नोंदवली गेली आहे. या प्रकरणी शिवाजी वाघवले (रा. पौड) यांनी पौड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी एका मुस्लिम युवकासह त्याच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 मे रोजी दुपारी सुमारे तीन वाजता चाँद नौशाद शेख (वय 19, रा. पौड) हा युवक नागेश्वर मंदिरात आला आणि त्याने अन्नपूर्णा देवीची मूर्ती मंदिरातून खाली उतरवून तिची विटंबना केली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण असून, नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, रितेश जाधव नावाचे गृहस्थ मंदिरात दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना अन्नपूर्णा देवीची मुर्ती हलवलेली असल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी ही बाब तातडीने शिवाजी वाघवले यांना कळवली. त्यानंतर वाघवले, जाधव आणि गावातील इतर काही ग्रामस्थांनी मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. सीसीटिव्ही तपासात चाँद नावाचा युवक मूर्तीची विटंबना करताना आढळून आला.

हा युवक नेमका कोण आहे आणि तो कुठे राहतो याबाबत गावकऱ्यांनी माहिती काढली. माहिती मिळाल्यानंतर संबंधित सर्वजण चाँदच्या घरी गेले. तेव्हा त्यांनी त्याचे वडील नौशाद शेख यांच्याकडे या कृत्याबाबत विचारणा केली असता, शेख यांनी त्या तरुणांना शिवीगाळ केली. त्यानंतर काही ग्रामस्थांनी चाँद शेख व त्यांचे वडील नौशाद शेख यांना थेट पौड पोलिस ठाण्यात आणले.  पौड पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी जमावाला शांत केले. चाँद शेख आणि नौशाद शेख यांना उपचारासाठी प्रथम पौड ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, त्या नंतर पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात हलवण्यात आले.

घटनेनंतर संताप, बंद आणि शांततेचा निर्धार

या घटनेमुळे संपूर्ण पौड गावात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. आज पौड गावात बंदची हाक देण्यात आली असून, मुळशी तालुक्यातही बंदचे आवाहन करण्यात आले आहे. पोलिसांनी चाँद शेख आणि त्याचे वडील नौशाद शेख या दोघांना ताब्यात घेतले आहे. या घटनेचा निषेध केवळ पौडमध्येच नव्हे, तर पुणे शहरातही होत आहे.

दरम्यान, ग्रामस्थांनी या घटनेबाबत प्रतिक्रिया देताना संयमाचे आणि शहाणपणाचे आवाहन केले. एका ग्रामस्थाने सांगितले की,  “आंब्याच्या आडीतील दोन आंबे नासले म्हणून संपूर्ण आडी नासते असे नाही. त्यामुळे दोन्ही समाजांनी शांतता राखत या घटनेचा निषेध करावा आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी. घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थांच्या वतीने शांततेच्या मार्गाने मोर्चा काढण्यात आला. यावेळी त्यांनी पौड पोलिस ठाण्याला निवेदन सादर करून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली.

 


 Give Feedback



 जाहिराती