नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सशस्त्र दलांनी मोठी कारवाई केली आणि पाकिस्तान, पीओकेमधील नऊ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. भारतीय सैन्याने रात्री उशिरा केलेल्या या कारवाईला 'ऑपरेशन सिंदूर' असे नाव देण्यात आले. भारतीय सैन्याची ही मोहीम फत्ते झाल्यावर बुधवारी (7 मे 2025) भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले. या पत्रकार परिषदेला संबोधित करण्यासाठी सैन्य दलातील दोन महिला अधिकारी पुढे आल्या. त्यापैकी एक हवाई दलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंग आणि दुसऱ्या भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी होत्या
ब्रीफिंग देताना विंग कमांडर व्योमिका सिंह म्हणाल्या की, गुप्तचर यंत्रणांच्या ठोस माहितीनंतर ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले. पाकिस्तानातील मुझफ्फराबाद येथे लष्करच्या प्रशिक्षण केंद्रावर हल्ला झाला. दहशतवाद्यांनी येथून प्रशिक्षण घेतले होते. दहशतवाद्यांचा कणा मोडण्यासाठी कारवाई करण्यात आली. बर्नाळा कॅम्प देखील पाडण्यात आला. सियालकोटमधील महमूना कॅम्प देखील उद्ध्वस्त झाला.
हवाई दलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंग आणि भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी यांनी मिळून पाकिस्तानचा पर्दाफाश केला. तसेच पाकिस्तानमध्ये कार्यरत असलेल्या दहशतवादी कारखान्यांवर लष्कराने हल्ला करून ते कसे उद्ध्वस्त केले हे सांगितले. सोफिया आणि व्योमिका या महिला अधिकारी नेमक्या कोण आहेत? जाणून घेऊयात त्यांच्याबाबत....
विंग कमांडर व्योमिका सिंग
व्योमिका सिंग या 18 डिसेंबर 2004 मध्ये भारतीय हवाई दलात नियुक्त झाल्या. सध्याच्या काळात सर्वोत्तम विंग कमांडरपैकी व्योमिका या एक मानल्या जातात. व्योमिका यांना लढाऊ हेलिकॉप्टर उडवण्याचा उत्कृष्ट अनुभव आहे आणि चित्ता, चेतक सारख्या लढाऊ हेलिकॉप्टर उडवण्यातही त्या एक्सपर्ट आहेत. वायुसेनेत सामील झाल्यानंतर 13 वर्षांनी व्योमिका सिंग यांना विंग कमांडर पद मिळाले. तर 18 डिसेंबर 2017 रोजी त्या विंग कमांडर झाल्या.
विंग कमांडर व्योमिका सिंग यांचा हवाई दलातील प्रवास एका स्वप्नाने सुरू झाला. व्योमिका यांना शाळेपासूनच विमान उडवायची इच्छा होती. त्यांच्या नावाचा अर्थ – “व्योमिका”, जी आकाशाशी संबंधित आहे. स्वत:च्या नावामुळेच त्यांच्या आकांक्षा आणखी बळकट झाल्या. त्यांनी नॅशनल कॅडेट कॉर्प्स (एनसीसी) मध्ये सामील होऊन अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले.
विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्या मते, जेव्हा त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले तेव्हा खूप कमी महिला हवाई दलात सामील होत्या. जेव्हा मी माझे शिक्षण पूर्ण केले तेव्हा मी UPSC द्वारे हवाई दलात प्रवेश केला आणि नंतर हेलिकॉप्टर पायलट झाली. व्योमिका सिंग म्हणाल्या, हेलिकॉप्टर पायलट असल्याने तुम्हाला अनेक कठीण आणि कठीण निर्णय घ्यावे लागतात आणि या निर्णयांमुळे आम्हाला अधिक मजबूत बनवले.
विंग कमांडर व्योमिका सिंग यांचा हवाई दलातील प्रवास एका स्वप्नाने सुरू झाला. व्योमिका यांना शाळेपासूनच विमान उडवायची इच्छा होती. त्यांच्या नावाचा अर्थ – “व्योमिका”, जी आकाशाशी संबंधित आहे. स्वत:च्या नावामुळेच त्यांच्या आकांक्षा आणखी बळकट झाल्या. त्यांनी नॅशनल कॅडेट कॉर्प्स (एनसीसी) मध्ये सामील होऊन अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले.
अनेक महत्त्वाच्या मोहिमांमध्ये बजावली महत्त्वाची भूमिका
व्योमिका सिंग या त्यांच्या कुटुंबातील पहिलीच मुलगी आहे जी सशस्त्र दलात सामील झाली आहे. व्योमिका यांना भारतीय हवाई दलात हेलिकॉप्टर पायलट म्हणून नियुक्त करण्यात आले आणि १८ डिसेंबर २०१९ रोजी त्यांना फ्लाइंग ब्रांचमध्ये कायमस्वरूपी कमिशन मिळाले. विंग कमांडर व्योमिका सिंह यांना २५०० तासांहून अधिक उड्डाणाचा अनुभव मिळाला आहे. त्यांनी जम्मू आणि काश्मीर आणि ईशान्येसह काही कठीण प्रदेशात चेतक आणि चित्ता सारखी हेलिकॉप्टर चालवली आहेत.
व्योमिका सिंह यांनी अनेक बचाव कार्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या ऑपरेशनल भूमिकेव्यतिरिक्त, विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी सहनशक्ती मोहिमांमध्ये देखील भाग घेतला आहे. २०२१ मध्ये, त्यांनी २१,६५० फूट उंचीवर असलेल्या माउंट मणिरंगवरील त्रि-सेवांच्या सर्व-महिला गिर्यारोहण मोहिमेत सामील झाल्या होत्या. या प्रयत्नाची दखल हवाई दल प्रमुखांसह वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्यांनी घेतली.
कर्नल सोफिया कुरेशी
पत्रकार परिषदेत हिंदीमध्ये संपूर्ण माहिती देणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांनी पाकिस्तानी दहशतवादाचा बुरखा फडला. तसेच पाकिस्तानमधील दहशतवादी अड्ड्यांचा प्रत्येक तपशील जगासमोर मांडला. सोफिया कुरेशी या कॉर्प्स ऑफ सिग्नल संलग्न अधिकारी आहेत. 35 वर्षीय सोफिया कुरेशी सध्या बहु-देशीय लष्करी सरावात भारतीय सैन्याच्या संपूर्ण तुकडीचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी आहेत.
सोफिया या 2016 मध्ये फोर्स 18 मिलिटरी ड्रिलमध्ये सहभागी झाल्या आणि त्याचे नेतृत्वही केले. एवढेच नाही तर गुजरातमधून आलेल्या सोफिया कुरेशी या एका लष्करी कुटुंबातून आल्या आहेत आणि त्यांच्याकडे बायोकेमिस्ट्रीची डीग्री सुद्धा आहे. सुमारे 6 वर्षांपासून त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेत भारताच्या वतीने योगदान दिले आहे आणि काँगोमध्ये हे अभियान पूर्ण केले आहे.