सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ब्लॅकआऊटवेळी हॉस्पिटलसोबत समन्वय यंत्रणा उभी करा. टार्गेट होऊ नये म्हणून लाईट बंद केले जातात, त्यामुळे पर्यायी विद्युत व्यवस्थेद्वारे यंत्रणा सुरू ठेवून, गडद रंगाचे पडदे अथवा गडद रंगाच्या काचा वापरून त्याचवेळी बाहेरून लाईट दिसणार नाही, अशी व्यवस्था करा.
  • पोलिस विभागाने नेहमीपेक्षा जास्त जागरूकता ठेवावी. देशद्रोही व्यक्तींच्या कारवाया वाढण्याची शक्यता पाहता अधिक कोंबिग ऑपरेशन करा आणि गस्त अधिक चोख करा.
  • प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांच्या सायबर सेलने समाजमाध्यमांवर देखरेख ठेवत पाकिस्तानला मदत करणारे हॅण्डल ओळखून त्यावर कारवाई करा. शत्रूला मदत करणारी अथवा चुकीची माहिती कुणी प्रसारित करीत असेल तर त्यावर कारवाई करा.
  • ब्लॅकआऊट म्हणजे काय आणि अशावेळी काय करावे, यांचे व्हिडिओ विद्यार्थी, नागरिकांपर्यंत पोहोचवा. व्यापक जनजागृती करा.
  • राज्यातील महत्वाच्या पदांवर विशेषतः आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन इत्यादी विभागांतील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
  • भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला.
  • भारत-पाकिस्तानमध्ये तणाव! पुण्यात ‘श्रीमंत’ दगडूशेठ गणपती’ मंदिराच्या सुरक्षेत मोठी वाढ
  • मुंबई-पुण्यात हाय अलर्ट जारी! नौदलाकडून मच्छिमारांना महत्वाच्या सूचना
  • चंदीगढमध्ये हवाई दल स्थानकाजवळ सायरन वाजवण्यात आले असून नागरिकांना घरात राहण्याचा आणि बाल्कनीपासून दूर राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
  • भारत-पाक संघर्षाचा शेअर बाजाराला दणका ! सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये; रिलायन्स, टाटा स्टॉक्सही घसरले
  • भारताशी पंगा घेणं अंगलट; पाकिस्ताननं असीम मुनीरलाच उचललं; लष्कर प्रमुखपदावरुन हटवलं? देशद्रोहाचा गुन्हाही दाखल ...
  • मुंबईच्या साकीनाका परिसरात संशयास्पद ड्रोनच्या घिरट्या, पोलीस सतर्क; कोम्बिंग ऑपरेशनला सुरुवात..
  • मोठी बातमी!! अखेर IPL स्पर्धा स्थगित; BCCI चा मोठा निर्णय
  • परराष्ट्र मंत्रालय पत्रकार परिषदेतेतील ठळक मुद्दे पाकीस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द ४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडून जाण्याचे आदेश भारताने सिंधू पाणी करारास स्थगिती अटारी वाघा बॅार्डर १ मे पर्यंत बंद
 विश्लेषण

मोठी बातमी! भारताकडून पाकिस्तानची रडार सिस्टिम उद्ध्वस्त; ड्रोन हल्ल्यांनी पाक हादरला

डिजिटल पुणे    08-05-2025 16:21:27

नवी दिल्ली  : भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये एअर स्ट्राइक करत 9 दहशतवादी तळ उद्ध्व्स्त केली होती. भारताच्या या कारवाई जवळपास 90हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. भारताच्या या ऑपरेशन सिंदूरमुळं पाकिस्तानमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने भारतावर हल्ल्याचा प्रयत्न केला होता. पाकिस्तानने पंजाब, गुजरात आणि राजस्थानमधील भारतीय लष्कराच्या तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे भारतीय वायूदलाने ड्रोनचा वापर करुन थेट पाकिस्तानच्या हवाई सुरक्षा यंत्रणेवरच स्ट्राइक केला. लाहोरमधील पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम आणि रडार यंत्रणा उद्ध्वस्त केली आहे. तसेच पुन्हा असा प्रयत्न केल्यास भारत सुट्टी देणार नाही असा इशाराही पाकिस्तानला देण्यात आला आहे.

पाकिस्तानी सैन्याने भारतातील अनेक शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानने पंजाब, गुजरात आणि राजस्थानमधील भारतीय लष्कराच्या तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे भारतीय वायूदलाने ड्रोनचा वापर करुन लाहोरमधील पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम आणि रडार यंत्रणा उद्ध्वस्त केल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तान भारतावर मोठा हल्ला करण्याच्या प्रयत्नात होता. हा हल्ला उधळून लावण्यासाठी भारताने ड्रोन हल्ला करुन पाकिस्तानची HQ-9 रडार यंत्रणा उद्ध्वस्त केली, अशी माहिती भारतीय लष्कराकडून देण्यात आली. अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगड, नल, फलोदी, उत्तरलाई आणि भुज या 15 ठिकाणी भारतीय लष्कराचे तळ लक्ष करण्याचा पाकिस्तानने प्रयत्न केला. पाकिस्तानने ड्रोन आणि मिसाईलचा वापर केला. आम्ही हाणून पाडला. डेब्रिज गोळा करण्याचे काम सुरू आहे,  अशी माहिती भारतीय लष्कराकडून देण्यात आली आहे.

भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर चवताळलेल्या पाकिस्तानने 7 आणि 8 मे2025 च्या रात्री अमृतसर, अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, जालंधर, भुज, आदमपूर, भटिंडा, लुधियाना भारतीय लष्कराच्या तळावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, भारतीय सैन्याने पाकिस्तानचा हा प्रयत्न हाणून पाडला. दरम्यान, HQ-9 ही चायना प्रेसिजन मशिनरी इम्पोर्ट-एक्सपोर्ट कॉर्पोरेशननं (CPMIEC) विकसित केलेली एक पृष्ठभागावरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र (SAM) प्रणाली आहे. ही क्षेपणास्त्र प्रणाली चीनच्या लष्करी तंत्रज्ञानाचं एक उत्तम उदाहरण मानली जाते आणि 2021 मध्ये पाकिस्ताननं आपल्या ताफ्यात तिचा समावेश केलेला.

दरम्यान, पाकिस्तानमधील या स्फोटांच्या मालिकेमुळे पाकिस्तानात घबराट पसरली आहे. तसेच या स्फोटानंतर संपूर्ण परिसर बंद करण्यात आला आहे. पाकिस्तानी मीडियानुसार, कराचीमध्ये ड्रोन ब्लास्ट झाले असून, ड्रोन ब्लास्टनंतर संपूर्ण भागात भीती पसरली आहे. तसेच या स्फोटानंतर सैन्याने संपूर्ण भाग आपल्या ताब्यात घेतला आहे. तर कराचीमधील पाकिस्तानच अणवस्त्र बॉम्ब स्टोर असून, या ड्रोन स्फोटामुळे पाकिस्तानच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पाकिस्तानने भारतावर केलेल्या सर्व हल्ल्यांना इंटिग्रेटेड काउंटर यूएएस ग्रिड आणि एअर डिफेन्स सिस्टमने यशस्वीरित्या निष्प्रभ केले. पाकिस्तानने ज्या पद्धतीने हल्ल्याचा प्रयत्न केला त्याच पद्धतीने जशास तसं उत्तर भारताने दिलं. पाकिस्तानच्या या हल्ल्यांचे अवशेष अनेक ठिकाणी सापडत आहेत. पाकिस्तानी हल्ल्याचा पुरावा म्हणून त्याची नोंद घेतली जात आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्तान मध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे. नागरिकांची पळापळ सुरु आहे. पाकिस्तान मध्ये प्रमुख शहरात सायरन वाजवले जात आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांनी भारताच्या या ड्रोन हल्ल्यानंतर पाक लष्करासोबत तातडीची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत ते काय भूमिका घेतात याकडे पाक जनतेचे लक्ष्य आहे.

 


 Give Feedback



 जाहिराती