सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ब्लॅकआऊटवेळी हॉस्पिटलसोबत समन्वय यंत्रणा उभी करा. टार्गेट होऊ नये म्हणून लाईट बंद केले जातात, त्यामुळे पर्यायी विद्युत व्यवस्थेद्वारे यंत्रणा सुरू ठेवून, गडद रंगाचे पडदे अथवा गडद रंगाच्या काचा वापरून त्याचवेळी बाहेरून लाईट दिसणार नाही, अशी व्यवस्था करा.
  • पोलिस विभागाने नेहमीपेक्षा जास्त जागरूकता ठेवावी. देशद्रोही व्यक्तींच्या कारवाया वाढण्याची शक्यता पाहता अधिक कोंबिग ऑपरेशन करा आणि गस्त अधिक चोख करा.
  • प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांच्या सायबर सेलने समाजमाध्यमांवर देखरेख ठेवत पाकिस्तानला मदत करणारे हॅण्डल ओळखून त्यावर कारवाई करा. शत्रूला मदत करणारी अथवा चुकीची माहिती कुणी प्रसारित करीत असेल तर त्यावर कारवाई करा.
  • ब्लॅकआऊट म्हणजे काय आणि अशावेळी काय करावे, यांचे व्हिडिओ विद्यार्थी, नागरिकांपर्यंत पोहोचवा. व्यापक जनजागृती करा.
  • राज्यातील महत्वाच्या पदांवर विशेषतः आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन इत्यादी विभागांतील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
  • भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला.
  • भारत-पाकिस्तानमध्ये तणाव! पुण्यात ‘श्रीमंत’ दगडूशेठ गणपती’ मंदिराच्या सुरक्षेत मोठी वाढ
  • मुंबई-पुण्यात हाय अलर्ट जारी! नौदलाकडून मच्छिमारांना महत्वाच्या सूचना
  • चंदीगढमध्ये हवाई दल स्थानकाजवळ सायरन वाजवण्यात आले असून नागरिकांना घरात राहण्याचा आणि बाल्कनीपासून दूर राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
  • भारत-पाक संघर्षाचा शेअर बाजाराला दणका ! सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये; रिलायन्स, टाटा स्टॉक्सही घसरले
  • भारताशी पंगा घेणं अंगलट; पाकिस्ताननं असीम मुनीरलाच उचललं; लष्कर प्रमुखपदावरुन हटवलं? देशद्रोहाचा गुन्हाही दाखल ...
  • मुंबईच्या साकीनाका परिसरात संशयास्पद ड्रोनच्या घिरट्या, पोलीस सतर्क; कोम्बिंग ऑपरेशनला सुरुवात..
  • मोठी बातमी!! अखेर IPL स्पर्धा स्थगित; BCCI चा मोठा निर्णय
  • परराष्ट्र मंत्रालय पत्रकार परिषदेतेतील ठळक मुद्दे पाकीस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द ४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडून जाण्याचे आदेश भारताने सिंधू पाणी करारास स्थगिती अटारी वाघा बॅार्डर १ मे पर्यंत बंद
 विश्लेषण

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान IPL बाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

डिजिटल पुणे    09-05-2025 12:41:19

मुंबई : भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात जोरदार युद्धाला सुरुवात झाली आहे. दोन्ही बाजूने एकमेकांवर ड्रोन हल्ला आणि मिसाईल डागण्यात येत आहेत. भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या प्रत्येक कारवाईला चोख प्रत्युत्तर दिले आहे. पाकड्यांच्या प्रत्येक डाव भारत हाणून पाडत आहे, मात्र तरीही पाकिस्तानचे शेपूट वाकडेच आहे. पाकिस्तानकडून 8 तारखेच्या रात्री भारतावर ड्रोन हल्ले करण्यात आले. त्यामुळे धर्मशाला इथे सुरु असलेला पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सचा सामना मध्येच थांबवण्यात आला होता. त्यानंतर रात्रभर भारताची धडक कारवाई, पाकिस्तानकडून अधून मधून होणारे हल्ले, या पार्श्वभूमीवर आता बीसीसीआयकडून आयपीएलचे उर्वरित सामने स्थगित करण्याची चिन्हं आहेत.

देशातील परिस्थिती दिवसेंदिवस बदलत आहे

 भारत आणि पाकिस्तानमधील तणाव लक्षात घेता बीसीसीआयने आयपीएल २०२५ बाबत आपले पर्याय खुले ठेवले आहेत. एकत्र हि स्पर्धा थांबवली जाऊ शकते किंवा स्पर्धेच्या वेळापत्रकात काही प्रमाणात सुधारणा करता येऊ शकते. अहवालानुसार, बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला (Rajeev Shukla) म्हणाले, “आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत, सरकारशी चर्चा करत आहोत आणि उद्या आयपीएलबाबत अंतिम निर्णय घेऊ. देशातील परिस्थिती दिवसेंदिवस बदलत आहे. सरकार आम्हाला जे काही सांगेल ते करू. सध्या, आमची पहिली प्राथमिकता सर्व खेळाडूंची सुरक्षा हीच आहे असेही राजीव शुक्ला यांनी म्हंटल.

दरम्यान, काल किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध दिल्ली कपिटल्स यांच्यातील धर्मशाळा येथील सामना चालू स्थितीत रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. एका वरिष्ठ क्रिकेट अधिकाऱ्याच्या फोन कॉल नंतर सामना रद्द करण्यात आला. स्टेडियमचे लाईट टॉवर बंद करण्यात आले आणि मैदानातं अंधार करण्यात आला. त्यानंतर प्रेक्षकांना बाहेर पडण्यास सांगितलं. तसेच दोन्ही संघांच्या खेळाडूंना ताबडतोब आपापल्या बसेसमध्ये चढून टीम हॉटेलमध्ये परतण्यास सांगण्यात आले. भारत आणि पाकिस्तान मधील युद्धजन्य परिस्थितीमुळे इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या पुढील सामन्यांवरही संकट ओढावले आहे. IPL 2025 मध्ये सहभागी असलेल्या परदेशी खेळाडूंना लवकरात लवकर त्यांच्या घरी जायचे आहे. बीसीसीआय मात्र सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि लवकरच ते आयपीएल संदर्भात मोठा निर्णय घेऊ शकता.

बीसीसीआय आयपीएल स्पर्धा दुसऱ्या देशात शिफ्ट करण्याचा निर्णय घेऊ शकते. भारताने काही संकट ओढावलं तर इतर देशात सामने आयोजित करते. दुसरीकडे, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पीएसएलचे उर्वरित सामने दुबईत खेळवण्याचा निर्णय घेतला आहे

पाकिस्तानी सैन्याने गुरुवारी रात्री भारताच्या सीमावर्ती भागात हवाई हल्ले केले होते. त्यानंतर भारतीय सैन्याने प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानातील प्रमुख शहर आणि कराची बंदरावर हल्ला केला होता. यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आता आयपीएल स्पर्धा रद्द करण्याविषयी विचारविनिमय सुरु आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयकडून आयपीएल स्पर्धा रद्द करायची की नाही, याविषयी चर्चा सुरु असल्याचे समजते. आयपीएलमधील सर्व संघांमध्ये अनेक परदेशी खेळाडू आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाद चिघळल्याने या परेदशी खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कालच हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथील पंजाब विरुद्ध दिल्लीचा सामान पाकिस्तानी ड्रोन हल्ल्यानंतर थांबवण्यात आला होता. यापुढील काळातही अशीच समस्या येऊ शकते. त्यामुळे आयपीएल स्पर्धा तुर्तास थांबवून उर्वरित आयपीएलची स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.


 Give Feedback



 जाहिराती