मुंबई : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या संघर्षाचा फटका आता थेट शेअर बाजारालाही बसताना दिसत आहे. आठवड्याच्या अखेरच्या व्यवहारदिवशी (शुक्रवार) भारतीय शेअर बाजार लाल चिन्हात उघडला. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा सेन्सेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी – दोन्ही प्रमुख निर्देशांकात तीव्र घसरण झाली आहे. सकाळच्या व्यवहारात सेन्सेक्स तब्बल 1,300 अंकांनी घसरत 78,968च्या पातळीवर आला. तर निफ्टीतही सुमारे 200 अंकांची घसरण पाहायला मिळाली. बाजार सुरू होताच Reliance, Tata, Adani Ports, PowerGrid यांसारख्या दिग्गज कंपन्यांचे स्टॉक्स रेड झोनमध्ये गेले.
युद्धसदृश वातावरणामुळे बाजार कोसळला
जरी आंतरराष्ट्रीय बाजारातून सकारात्मक संकेत मिळत होते. जसे की जपानचा Nikkei किंवा Gift Nifty हे ग्रीन झोनमध्ये व्यवहार करत होते. तरी भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावाचा प्रभाव भारतीय बाजारावर प्रखरपणे जाणवला. BSE Sensex ने गुरुवारीच्या 80,334.81 या बंद स्तराच्या तुलनेत 78,968 वर घसरत सुरुवात केली.हळूहळू थोडीफार सावरत 10 मिनिटांतच सेन्सेक्सने 700 अंकांची सुधारणा करत 79,633 वर पोहोचण्याचा प्रयत्न केला.
फक्त 327 कंपन्यांचे शेअर्स ग्रीन झोनमध्ये
आजच्या सुरुवातीच्या व्यवहारात एकूण 2014 कंपन्यांचे शेअर्स घसरले, तर फक्त 327 स्टॉक्स ग्रीन झोनमध्येव्यवहार करत होते. युद्धसदृश वातावरणामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण आहे. मात्र, या साऱ्यांमध्ये डिफेन्स क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स रॉकेटसारखे झपाट्याने वधारले.
कोणते शेअर्स वाढले, कोणते घसरले?
चढणारे शेअर्स
Titan Company
L\&T (Larsen & Toubro)
Bharat Electronics (BEL)
Dr. Reddy’s Laboratories
घसरलेले शेअर्स
Power Grid Corporation
Adani Ports & SEZ
Adani Enterprises
Asian Paints
डिफेन्स कंपन्यांमध्ये गुंतवणूक वाढणार?
दहशतवादविरोधी ऑपरेशन आणि युद्धसदृश परिस्थितीमुळे डिफेन्स क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गुंतवणूकदारांचा ओघ वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. BEL, HAL, L\&T यांसारख्या कंपन्यांचे शेअर्स पुढील काही दिवसात आघाडीवर राहतील असा अंदाज आहे. राजकीय आणि सामरिक अस्थिरतेचा परिणाम शेअर बाजारावर सरळ होतो आहे. अशा काळात गुंतवणूकदारांनी सतर्क राहून दीर्घकालीन आणि मूल्यात आधारित रणनीती स्वीकारणे योग्य ठरेल.