जम्मू काश्मीर :दहशतवाद्यांवर भारताने एअर स्ट्राइक केल्यानंतर पाकिस्तान चांगलाच बिथरला आहे. पाकिस्तानी सैन्याने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मागील काही दिवसांपासून पाकिस्तानकडून आगळीक करत प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर तणावाची स्थिती आहे. भारतीय लष्कर आणि हवाई दलानंतर आता सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) आपला दम दाखवला आहे. बीएएसएफने जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांचा खात्मा केला.
जम्मूमधील सांबा सेक्टरमधून काल रात्री भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणारे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे सात दहशतवादी सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) कारवाईत ठार झाले आहेत. गुरूवारी ८ मे रोजी रात्री ११ वाजता BSF जवानांना संशयास्पद हालचाली दिसून आल्यावर त्यांनी तत्काळ कारवाई सुरू केली. या ऑपरेशनमध्ये पाकिस्तानच्या धंधार पोस्टचे दहशतवाद्यांकडून मोठे नुकसान करण्यात आले. कारवाईची अधिकृत माहिती BSF ने X (माजी ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केली.
पाकिस्तानी ड्रोन आणि क्षेपणास्त्र विमानांनी जम्मू काश्मीरपासून पंजाब, राजस्थान आणि गुजरातपर्यंतच्या शहरांमधील भारतीय लष्करी तळांना लक्ष्य करण्याचे धाडस केले परंतु त्यापैकी कोणत्याही ठिकाणी त्यांना यश मिळाले नाही. भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने त्या सर्वांना हाणून पाडले आहे. पाकिस्तानने संपूर्ण जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर गोळीबार केला आहे, ज्याला भारतीय सैन्य योग्य उत्तर देत आहे.
काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधी केली जात आहे. या गोळीबाराच्या आडून पाकिस्तान दहशतवाद्यांना भारताच्या हद्दीत पाठवत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.जम्मू-काश्मीरमधील सांभा येथे बीएसएफने पाकिस्तानच्या गोळीबाराला उत्तर देताना घुसखोरांना ठार केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जैश-ए-मोहम्मदचे 7 दहशतवादी बीएसएफ जवानांनी ठार केले. ठार झालेले जैशचे 7 भारताच्या हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती समोर आली आहे.