पुणे: बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे सुप्रसिध्द अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांचा नियम व अटी लागू या अतिशय सुंदर कौटुंबिक विनोदी नाट्य प्रयोगाचे वेळी,शांतीदूत परिवारातर्फे डॉ.विठ्ठल जाधव IPS विशेष पोलिस महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य से.नि., मार्गदर्शक शांतीदूत परिवार व सौ. विद्या ताई जाधव संस्थापक अध्यक्षा शांतीदूत परिवार यांचं शुभ हस्ते _ शांतीदूत कला रत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.या प्रसंगी शांतीदूत परिवाराच्या ज्येष्ठ सल्लागार सौ. डॉ. प्रीती काळे, शांतीदूत परिवार अध्यक्ष शिवाजीनगर मधुकर चौधरी, विजय ठुबे राष्ट्रीय अध्यक्ष शेतकरी शांतीदूत परिवार,शांतीदूत सौ. शीतल चौधरी व परिवार उपस्थित होते. शांतीदूत परिवारातर्फे अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा ध्यास माणुसकीचा, शांतीदूत जयते.