सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
 शहर

नियमित रक्तदानासाठी पुढाकार घ्या'!'रक्ताचे नाते' ट्रस्टचे रक्तदाता दिवसानिमित्त आवाहन

डिजिटल पुणे    13-06-2025 11:18:57

पुणे :  "नियमित रक्तदानासाठी पुढाकार घ्या" असे आवाहन 'रक्ताचे नाते' चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जागतिक रक्तदाता दिवसानिमित्त करण्यात आले आहे. ट्रस्टचे अध्यक्ष राम बांगड यांनी जगभरातील रक्तदात्यांना शुभेच्छा दिल्या असून, रक्तदान क्षेत्रासमोरील समस्या आणि उपाय योजनांची माहिती पत्रकाद्वारे दिली आहे.दरवर्षी जगभर १४ जून हा रक्तदाता दिवस म्हणून साजरा केला जातो. 

स्वतः तब्बल १७८ वेळा रक्तदान करणारे आणि ७०,००० पेक्षा अधिक रक्तदात्यांची साखळी निर्माण करणाऱ्या  राम बांगड यांनी सांगितले की, "रक्तदान हा अत्यंत साधा पण जीवनदायी विषय असताना, आजही अनेक अडचणींनी हे कार्य गुंतागुंतीचे बनले आहे.काही ब्लड सेंटर्स व्यापारी पद्धतीने चालवले जात असून,रुग्णांच्या नातेवाईकांना रक्तदाते आणण्यासाठी वेठीस धरले जाते.रक्तदात्यांना सन्मान मिळत नाही आणि शिबिर आयोजकांना प्राथमिकतेने रक्त दिले जात नाही." 

बांगड म्हणाले, "रक्तदान शिबिर आयोजक हा रक्तदान चळवळीचा आत्मा असतो. तो स्वतःचा वेळ, पैसा आणि श्रम देतो. तरीही त्याला रक्तसाठ्यावर प्राथमिकता मिळत नाही, हे दुर्दैवी आहे."ब्लड सेंटर्स अमिष दाखवून गिफ्ट देतात, पण अशा केंद्रांवर कारवाई करण्याचे कोणतेही स्पष्ट धोरण नाही.जर भारतातील केवळ १ टक्का तरुण नियमित रक्तदान करू लागले, तर देशात रक्ताचा तुटवडा कधीच जाणवणार नाही. समाजसेवेच्या भावनेने नोंदणीकृत असलेल्या अनेक ब्लड सेंटर्समध्ये ती भावना हरवताना दिसते, ही चिंतेची बाब आहे,मात्र पुण्यातील तरुण वर्ग रक्तदानासाठी सातत्याने पुढे येतो, हे मात्र एक आशादायी चित्र आहे.

बांगड यांनी सांगितले की, 'रक्ताचे नाते' ट्रस्टच्या वतीने दर गुरुवारी पुण्यातील श्री सदगुरू शंकर महाराज मठात रक्तदानासाठी नोंदणी केली जाते, तर दर दुर्गाष्टमीला विशेष रक्तदान शिबिर आयोजित केले जाते. तिथे आजवर ट्रस्टमार्फत १६,२८८ रक्तपिशव्या जमा करण्यात आल्या आहेत. सध्या अहमदाबादमध्ये रक्ताचा कोणताही तुटवडा नाही आणि नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता रक्तदानासाठी नेहमी सज्ज राहावे."रक्तदान करा... जीवनदान द्या!" असे आवाहन त्यांनी केले आहे .


 Give Feedback



 जाहिराती