सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
 DIGITAL PUNE NEWS

'कांटा लगा गर्ल' फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचे निधन; वयाच्या 42व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास..

डिजिटल पुणे    28-06-2025 10:48:27

मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल शेफाली जरीवाला हिचे वयाच्या 42 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. बिग बॉस 13 आणि ‘कांटा लगा’ या आयकॉनिक म्युझिक व्हिडीओमुळे रातोरात लोकप्रिय झालेल्या शेफालीला शुक्रवारी (दि.27) रात्री उशिरा तब्येत बिघडल्यामुळे रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी तिला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.

 कांटा लगा या गाण्यानं प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घालणारी अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचं निधन झालं आहे. वयाच्या 42 व्या शेफाली जरीवाला हिनं मुंबईत अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या धक्क्यानं शेफाली जरीवाला हिचं निधन झाल्याची माहिती तिच्या निकटवर्तीयांनी दिली. याबाबत सेलिब्रेटी फोटोग्राफर विरल भयानी यांनीही सोशल माध्यमांवर पोस्ट शेयर करुन दु:ख व्यक्त केलं आहे.

शेफाली जरीवाला हिला गुरुवारी रात्री उशीरा हृदयविकाराचा झटका आला. यावेळी तिचा पती पराग त्यागी यानं तिला तत्काळ रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. तिचा मृत्यू हृदविकाराच्या धक्क्यानं झाल्याचं तिच्या निकटवर्तीयांनी सांगितलं. मात्र मृत्यूच्या नेमक्या कारणाविषयी तिच्या कुटुंबाकडून अद्याप कोणतंही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेलं नाही. दरम्यान शेफाली जरीवालाचा मृत्यू झाल्यानं मनोरंजन क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

शेफाली जरीवालाचे दोन लग्न झाले होते. तिचे पहिले लग्न 2004 मध्ये मीत ब्रदर्सचे संगीतकार हरमीत सिंग यांच्याशी झाले होते, परंतु 2009मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर 2015 मध्ये शेफालीने अभिनेता पराग त्यागीशी लग्न केले. शेफाली जरीवालाने संगणक अनुप्रयोगात पदवी प्राप्त केली होती.

शेफाली जरीवालाने आपल्या अप्रतिम अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांची मने जिंकली होती. 2002 मध्ये तिचे 'कांटा लगा' गाणे प्रसिद्ध झाले होते. या गाण्यातील तिच्या डान्सने, तिला रातोरात प्रसिद्धी मिळाली. शेफालीचा जन्म 15 डिसेंबर 1982 रोजी अहमदाबादमध्ये झाला होता. ती अनेक म्‍युझिक व्हिडिओज, रिअॅलिटी शोज आणि चित्रपटांतही दिसून आली आहे. ती 2019 मध्ये सलमान खानचा प्रसिद्ध रिअॅलिटी शो 'बिग बॉस 13' मध्येही दिसली होती.

शेफालीच्या मृत्यूमुळे संपूर्ण मनोरंजनविश्वात शोककळा पसरली असून सोशल मीडियावर चाहत्यांकडून श्रद्धांजली वाहिली जात आहे. शेफालीचे निधन इतके अचानक झाले की अनेकांना त्यावर विश्वासच बसलेला नाही. अद्याप तिच्या कुटुंबीयांनी किंवा प्रतिनिधींनी अधिकृत निवेदन दिलेले नाही.


 Give Feedback



 जाहिराती