सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
 शहर

पुण्यात मोहल्ला कमिटी बैठकीत शिवसेना शिंदे गट व अजित पवार गटात जोरदार वादावादी

डिजिटल पुणे    28-06-2025 12:18:22

पुणे : गेल्या काही दिवसांपासून महायुतीमधील वाद चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. राज्यात एकिकडे शिंदे गटाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नाराजी आहेत. तर दुसरीकडे पुणे शहरातदेखील हीच परिस्थिती असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.  अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेतृत्व करत असलेल्या शिवसेनेमध्ये सारं काही अलबेल नसल्याचे चित्र आहे. 

पुण्यातील धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयात आयोजित मोहल्ला कमिटीच्या बैठकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष सुभाष जगताप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी उद्धव कांबळे यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. 

मोहल्ला कमिटीच्या बैठकीदरम्यान स्थानिक पायाभूत सुविधा, कचरा व्यवस्थापन आणि अनधिकृत बांधकामासंदर्भात चर्चा सुरू असताना पद्मावती भागातील एका सोसायटीच्या महिला पदाधिकाऱ्याने सोसायटीच्या बाजूला झोपडपट्टी असून अवैध धंदे चालतात असा दावा ठोकत  ते बंद करण्याची मागणी केली. यावळी  शिवसेनेचे पदाधिकारी उद्धव कांबळे यांनी हस्तक्षेप केला असता सुभाष जगताप यांनी त्यांना बोलण्यास नकार दिला. 

त्यानंतर काही वेळानंतर पुन्हा कांबळे बोलण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांनी समस्येवर भाष्य न करत जगताप यांच्यावर आरोप केले. अवैध धंदे सुरु असणारी जागा सुभाष जगताप यांचीच होती असा दावा केला. त्यावेळी दोघांमध्ये आपरो प्रत्यारोप रंगले. दोघांमध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. 


 Give Feedback



 जाहिराती