मुंबई : राज्यामध्ये मराठी विरुद्ध हिंदी असा वाद निर्माण झाला. राज्य सरकारकडून प्राथमिक शाळांमध्ये हिंदी सक्ती लादण्याचा प्रयत्न झाला असल्याचा आरोप राजकीय पक्षांकडून करण्यात आला. या विरोधात शिवसेना ठाकरे गट आणि मनसे पक्ष जोरदार लढा दिला. तसेच येत्या 5 जुलै रोजी मराठी अस्मितेसाठी ठाकरे बंधूंनी एकत्रितपणे मोर्चाची देखील घोषणा केली होती.मात्र त्रिभाषा धोरणाबाबतचा जीआर सरकारने रद्द केल्यावर आता 5 जुलैला ठाकरेंची शिवसेना आणि मनसे विजयी मेळावा साजरा करणार आहेत. वरळी डोम येथे ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांचा भव्य एकत्रित मेळावा होणार आहे. सकाळी 10 वाजता या विजयी मेळाव्याला सुरुवात होईल.
शिवसेनेचं मुखपृष्ठ असलेल्या सामनामधून मेळाव्याचे ठिकाण अधिकृतपणे जाहीर करण्यात आलं आहे. विजयी मेळाव्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर पाहायला मिळणार आहेत. मेळाव्याची जोरदार मोर्चेबांधणी सुरू असून ठाकरेंची शिवसेना आणि मनसे नेत्यांमध्ये नियोजनाच्या बैठका सुरू आहेत. याचदरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच एकत्र आवाहन केलं आहे.
हिंदी भाषा सक्तीविरोधात आणि मराठी अस्मितेसाठी ठाकरे बंधू हे एकत्रित मोर्चा काढणार होते. मात्र महायुती सरकारने यासंबंधित दोन्हीही शासन आदेश रद्द केले. यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मोर्चा रद्द झाला असली तरी सभा घेण्यात येणार आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची एकत्रितपणे विजयी सभा पार पडणार आहे. येत्या 5 जुलै रोजी ठाकरे बंधूंची एकत्रित सभा होणार आहे. यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये उलथापालथ होणार आहे. यापूर्वी आता ठाकरे बंधूंनी मराठी माणसांना आवाहन केले आहे.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्रितपणे सभा घेण्याचे ठरवले आहे. याबाबत आवाहन करत त्यांनी सोशल मीडिया पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, आवाज मराठीचा ! मराठी मातांनो, भगिनींनो आणि बांधवांनो, सरकारला नमवलं का ? तर हो नमवलं…! कोणी नमवलं तर ते तुम्ही, मराठी जनांनी नमवलं ! आम्ही फक्त तुमच्या वतीने संघर्ष करत होतो. त्यामुळे हा आनंद साजरा करतानासुद्धा, आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजक आहोत, बाकी जल्लोष तुम्ही करायचा आहे. वाजत गाजत या, जल्लोषात, गुलाल उधळत या !! आम्ही वाट बघतोय…! आपले नम्र राज ठाकरे – उद्धव ठाकरे, असे आवाहन ठाकरे बंधूंनी मराठी बांधवांना केले आहे.
विजयी मेळाव्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर पाहायला मिळणार आहेत. मेळाव्याची जोरदार मोर्चेबांधणी सुरू असून ठाकरेंची शिवसेना आणि मनसे नेत्यांमध्ये नियोजनाच्या बैठका सुरू आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजय राऊत, अनिल परब,वरूण सरदेसाई तर मनसेकडून बाळा नांदगावकर, अभिजीत पानसे, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई यांच्याकडे नियोजनाची जबाबदारी देण्यात आली आहे. मुंबईतील मोठ्या सभागृहामध्ये हा मेळावा आम्ही घेत आहोत,” अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.