मुंबई : राज्य शासनानं कोणत्याही बाईक ॲपला अद्यापि अधिकृत परवानगी दिलेली नसताना अवैधरित्या App द्वारे आरक्षण करून प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या रॅपिडो बाईकला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रंगेहात पकडले आहे.सर्व बाईक टॅक्सी या अनधिकृत : शासनानं नुकतंच ई-बाईक धोरण जाहीर केलं आहे. त्यानुसार विविध अटी -शर्तीचं पालन करणाऱ्या व केवळ इलेक्ट्रिक बाईक असलेल्या संस्थांना यापुढं बाईक टॅक्सीची परवानगी मिळणार आहे. त्यामुळं सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व बाईक टॅक्सी या अनधिकृत आहेत.
राज्य शासनाने कोणत्याही बाईक ॲपला अद्यापि अधिकृत परवानगी दिलेली नसताना अवैधरित्या अँप द्वारे आरक्षण करून प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या रॅपिडो बाईकला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रंगेहात पकडले.शासनाने नुकतेच इ-बाईक धोरण जाहीर केले आहे. त्यानुसार विविध अटी -शर्तीचे पालन करणाऱ्या व केवळ इलेक्ट्रिक बाइक असलेल्या संस्थांना यापुढे बाईक टॅक्सीची परवानगी मिळणार आहे. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व बाईक टॅक्सी या अनधिकृत आहेत.या संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन विभागाला याबाबत विचारले असता, मुंबई अथवा इतर शहरांमध्ये कोणतीही अनधिकृत बाईक टॅक्सी ॲप अस्तित्वात नाही. असे सरकारी उत्तर मिळाले.
या संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन विभागाला याबाबत विचारलं असता, "मुंबई अथवा इतर शहरांमध्ये कोणतीही अनधिकृत बाईक टॅक्सी App अस्तित्वात नाही. असं सरकारी उत्तर मिळालं." तथापि , त्याची उलट तपासणी करण्याच्या हेतूनं मंत्री सरनाईक यांनी रॅपिडो बाईक टॅक्सी App वर स्वतः अनोळखी नावानं बाईक बुक केली. पुढच्या दहा मिनिटांमध्ये सदर बाईक त्यांना घेऊन जाण्यासाठी मंत्रालयातील शहीद बाबू गेनू चौकामध्ये हजर झाली. अशाप्रकारे अनधिकृतरित्या बाईक App चालवणाऱ्या संस्थेचा भांडाफोड स्वतः परिवहन मंत्र्यांनी केला.
बाईकच्या चालकाला मंत्री प्रताप सरनाईक यांनी भाडे म्हणून ५०० रुपये देऊ केले. "तुझ्यासारख्या गोरगरीबावर गुन्हा दाखल करून आम्हाला काहीच साध्य होणार नाही. तथापि, या मागे लपलेल्या बड्या धेंडाना शासन झालं पाहिजे हाच आमचा हेतू आहे," असं मंत्री सरनाईक म्हणाले. आता खुद्द मंत्री महोदयांना खोटी माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई होईल? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.