सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
 DIGITAL PUNE NEWS

एकनाथ शिंदेंकडून ‘जय गुजरात’ची घोषणा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..

डिजिटल पुणे    04-07-2025 18:19:57

पुणे : पुण्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दौऱ्यावर आले होते. यावेळी गुजरात भवन येथे कार्यक्रमामध्ये अमित शाह यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी उपस्थितांना भाषण दिले. भाषणाच्या शेवटी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘जय गुजरात’ अशी घोषणा दिली आहे. यामुळे आता राज्यामध्ये वाद पेटला आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय गुजरात म्हटलं, म्हणाजे शिंदे यांच गुजरातवर प्रेम व महाराष्ट्रावर प्रेम नाही असं होत नाही. शरद पवारांनीही अशी एकदा कर्नाटकच्या लोकांमध्ये घोषणा दिली होती.  त्यामुळं इतका संकुचीत विचरा कुणी करत असेल तर ते चुकीच आहे. आता विरोधकांना मुद्दे नाही असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांची पाठराखन करून विरोधकांना सुनावलं आहे.

काय म्हणाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

आजचा दिवस संपूर्ण गुजरात समाजासाठी महत्त्वपूर्ण आहे. याठिकाणी मी बघत येत होतो. येथे काहीही कमी नाही. तुम्ही सगळे लक्ष्मीपुत्र आहात. पैसे कमी पडण्याची गोष्टच नाही. त्यामुळे तुमचे स्वप्न पूर्ण झाले. ज्या कामांचे भूमिपूजन हे पंतप्रधान मोदी करतात ते काम लवकर पूर्ण होते, अशा भावना एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या. आमच्यासाठी मोदीजी आणि अमित भाई वेगळे नाही. मोदींची सावली हे अमित शाह आहेत. अमित शाह यांचा स्पर्श झाल्यानंतर त्या कार्याचे सोने होते.मला आनंद दिघे यांनी सांगितलेली गोष्ट आठवत आहे. कोणतेही शहरं असो, कोणते मोठे गृहसंकुल असो किंवा कोणतेही नवे शहर तयार होवो. पण जो पर्यंत तिथे बाजारपेठ तयार होत नाही तो पर्यंत त्या शहराची शोभा वाढत नाही. आणि ही बाजारपेठ बसवणारे तुम्ही व्यावसायिक लोक आहात. त्यामुळे तुमच्या शिवाय कोणत्याही शहराची शोभा वाढत नाही,” असे मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

 

भाषणाच्या शेवटी एकनाथ शिंदे यांनी ‘जय महाराष्ट्र, जय हिंद आणि जय गुजरात’ अशी घोषणा दिली. यामुळे आता वादाला तोंड फुटले आहे. राज्यामध्ये हिंदी विरुद्ध मराठी असा वाद सुरु असताना एकनाथ शिंदे यांनी जय गुजरात अशी घोषणा दिल्याने वाद निर्माण झाला आहे.

 

मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया काय? 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधानावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “कर्नाटकमधील चिकोडी येथे एका कार्यक्रमात शरद पवार यांनी जय महाराष्ट्र, जय कर्नाटक असे म्हटले होते. याचा अर्थ त्यांच कर्नाटकवर जास्त प्रेम आणि महाराष्ट्रावर कमी आहे असा होतो का? ज्यांच्या कार्यक्रमात आपण जात असतो, त्यांच्याविषयी आपण बोलत असतो. ”

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, “एकनाथ शिंदे गुजराती समाजाच्या कार्यक्रमात गेल्याने ते जय गुजरात म्हणाले. म्हणजे त्याचे गुजरतवर जास्त प्रेम आणि महाराष्ट्रावर कमी प्रेम असे होत नाही. मराठी माणसाला इतका संकुचित विचार शोभत नाही. मराठी माणूस हा वैश्विक आहे. याच मराठी माणसाने अटकेपार झेंडा रोवला आहे.


 News Feedback

Digital Pune
Keith Coley
 04-07-2025 19:50:40

Needing to enhance your website traffic flow? Our smart platform pulls ideal website traffic through keywords or place-based tags from global zones to towns. Desiring more revenue, active pages, or a larger online presence? We shape it to your plan. Enjoy a 7-day free trial period with no contract. Begin here: https://cutt.ly/grT4RvEM

Digital Pune
Tyrone Worrell
 05-07-2025 10:57:16

Unlock more targeted leads with our AI! Watch this short video to get started: https://www.youtube.com/watch?v=0vQRdhaE2j8

Digital Pune
Shirley Aston
 05-07-2025 12:00:52

Want more targeted traffic to your website? Our AI solution delivers real results. Sign up for a 7-day free trial. https://cutt.ly/yrT4cwWH

Digital Pune
Kala Belisario
 05-07-2025 12:47:32

Not enough leads coming to your site? Our AI-powered service targets the right audience for you. Start your 7-day free trial. https://cutt.ly/wrT4x6Sx

 Give Feedback



 जाहिराती